शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

देवीआई भक्तांच्या हाकेला धावली, अस्तिकट्यार मिळवण्यात त्रिनयना देवीच्या लेकींना यश, आता तरी विरोचकाचा वध होणार का?

Saurabh Moreby Saurabh More
जून 16, 2024 | 9:11 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update Netra and Indrani succeeded in gettingdivine dagger disappears

देवीआई भक्तांच्या हाकेला धावली, अस्तिकट्यार मिळवण्यात त्रिनयना देवीच्या लेकींना यश, आता तरी विरोचकाचा वध होणार का?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपाली बाहेर जाऊन काहीतरी कटकारस्थान करत असल्याचा संशय नेत्रा व इंद्राणी यांना आला असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर राजाध्यक्ष कुटुंबीयांनी रुपालीविरुध्द केलेल्या प्लॅननुसार केतकी काकू रुपालीबरोबर चांगल्या वागत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच आजच्या भागात रुपाली अस्तिकट्यार नष्ट करण्यासाठी घरातील सर्वांपासून लपून निघते. मात्र रुपालीच्या मागावर शेखर व इंद्राणी निघतात.

रुपालीच्या मागे हे कुणी येत नसल्याचे समजून ती अस्तिकट्यार लपवून ठेवलेल्या ठिकाणी जाते आणि अतिकट्यार नदीत फेकून देण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून ती कट्यार कुणाच्याच हाती लागू नये. मात्र रुपालीला ती कट्यार उचलणे शक्य होत नाही. देवी आईच्या कृपेमुळे ती कट्यार इतकी जड होते की ती कट्यार रुपालीला उचलताच येत नाही. कट्यार उचलण्याचा प्रयत्न कट्ट असताना ती कट्यार रुपालीच्या अंगावर येते. कसेतरी करुन रुपाली ती कट्यार तिच्या शरीरावरुन उचलून बाजूला ठेवते आणि लपवून पुन्हा घरी जाते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

रुपाली हे सगळं करत असताना इंद्राणी व शेखर तिच्यावर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे ती  निघून जाताच रुपाली ती देवी आईच्या पाया पडून ती अस्तिकट्यार उचलते. इकडे घरात नेत्रा व अद्वैतला नेत्रा व शेखरची चिंता लागून राहीलेली असते. मात्र अद्वैत नेत्राला त्यांची वाट बघण्याचा सल्ला देतो. इतक्यात नेत्रा व इंद्राणी कट्यार घेऊन घरी येतात.

आणखी वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी अक्षरा-अधिपतीचा कुटुंबियांनीच सजवला बेड, भुवनेश्वरी मात्र दोघांना विभक्त करण्याच्या तयारीत, काय होईल परिणाम

रुपालीला ती कट्यार एकटीला उचलता येत नसल्याने ती काही माणसांना ती कट्यार उचलण्यासाठी घेऊन येते. मात्र ती तिथे पोहोचण्याआधीच इंद्राणी व शेखर यांनी ती कट्यार तिथून घरी घेऊन आलेले असतात. रुपाली मात्र ती कट्यार शोधत बसते. इतकेच नव्हे तर ती त्या माणसांनादेखील कट्यार शोधण्याचे सांगते. मात्र ती माणसे रुपालीला वेडी समजून तिथून पळ काढतात. एकीकडे ती कट्यार शोधण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे इंद्राणी नेत्राला आपल्याला आता नऊ महिने काहीच करता येत नसल्याचे सांगते. त्यानंतर रुपाली घरात येते, तेव्हा शेखर तिला बाहेर गेली असल्याबद्दल अनेक प्रश्न विचारतो. तसेच यापुढे मला विचारता माझी गाडी घेऊन जाण्याबद्दल सक्त ताकीदही देतो.

आणखी वाचा – मेष, वृषभ व कुंभ राशीच्या लोकांवर असणार शनिदेवाची कृपा, कुणाला होणार नेमका फायदा, जाणून घ्या…

यानंतर शेखर व इंद्राणी ती अस्तिकट्यार विरोचकांच्या हातात  लागणार नाही अशा  ठिकाण लपवून ठेवतात. यंत्र नेत्रा त्रिनयना देवीकडे विरोचकाला कसं मारता येईल? याकडे नऊ महिने आस्तिकट्यार विरोचकापासून काशी लपवणार? आणि या काळात विरोचकाने घरातील कुणाला काही करु नये याबद्दल प्रार्थना करते. त्यामुळे आता मालिकेच्या पुढील भागांसाठी कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Ashok saraf jivangaurav purskar

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान, शरद पवारांच्या हस्ते सन्मान

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.