‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. रहस्यमय कथेवर आधारित असलेली ही मालिका साऱ्यांच्याच पसंतीस पडत आहे. मालिकेचे कथानक, मालिकेतील कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका एका उंचीवर पोकहोचली आहे. मालिकेच्या कथानकातील एखादे वळण प्रेक्षकांना आवडले तर ते त्यावर आपली पसंती दर्शवतात, पण मालिकेतील एखादा ट्विस्ट आवडला नाही तर त्याबद्दलही प्रेक्षक आपली प्रतिक्रिया देतात.
अशातच या मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला असून या नवीन ट्विस्टमध्ये रुपाली राजाध्यक्ष कुटुंबियांना नेत्रा, अद्वैत व इंद्राणीवर हल्ला करायला सांगते. या नवीन ट्विस्टचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मालिकेतील हा नवीन ट्विस्ट काही प्रेक्षकांना आवडला आहे तर काहींना हा नवीन ट्विस्ट अजिबातच आवडला नाही. याबद्दलचे मत त्यांनी कमेंट्समध्ये व्यक्त केले आहे.
या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “तुम्ही प्रेक्षकांचा मानसिक छळ करत आहात. या मालिकेची संकल्पना सुरवातील छान होती. पण आता प्रेक्षकांची सहनशीलता संपली हे. नवीन प्रोमोमुळे उत्कंठा वाढत नाही पण तणाव वाढतो. सर्व सुजाण प्रेक्षकांनी ज्या कमेंट्स केल्या आहेत त्याचा आदर करा.” तर आणखी एकाने “अरेरे काय हे? मुर्खासारखे काहीही दाखवाल का?, बावळटगिरी चालू आहे नुसती. ही मालिका आता बघवत नाही. मूर्खपणाचा कळस आहे. बंद करा ही मालिका”.

दरम्यान, “अनेकांनी टीव्हीवर एवढी क्रूरता दाखवतात का?, थिल्लरपणा चालू केला आहे. तुम्ही देवीच्या नावाने चेष्टा करत आहात, .काय नसेल तर बंद करा ही मालिका. या जागी नवीन मालिका बघायला मिळेल.” अशा अनेक नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी या नवीन ट्विस्टबद्दल उत्सुकता दाखवली आहे व त्यांना हा नवीन प्रोमो आवडला असल्याचेही म्हटले आहे.