कलाकार हे सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आयुष्यातील अनेक खास प्रसंगे, किस्से वा आठवणी शेअर करत असतात. कलाकार म्हटलं की कौतुकाबरोबर टीका व ट्रोलिंगदेखील आली. काही कलाकार सोशल मीडियावरील या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. पण काही कलाकार मात्र या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात. यांपैकीच एक नाव म्हणजे ऐश्वर्या नारकर. त्या नेहमीच सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देतात. गेल्या दशकापासून सहजसुंदर अभिनयाने व सोज्वळ सौंदर्याने ऐश्वर्या नारकरांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आपल्या अभिनयाने नेहमीच चर्चेत राहत असतात. आपल्या कामाबरोबर सोशल मीडियावर पोस्टमुळे ऐश्वर्या नारकर कायम चर्चेचा विषय असतात. त्यांचे योग व्हिडीओ, मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. त्यामुळे त्या अनेकदा ट्रोल होतात. पण ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर सडेतोड उत्तर देताना दिसतात. अशातच त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने नकरात्मक कमेंट केली असून या नेटकऱ्याचा ऐश्वर्या यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

आणखी वाचा –
ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांचा रविवारचा दिवस कसा असतो? याचे वर्णन केलं आहे. यामध्ये त्या एका झोपाळ्यावर निवांत बसलेल्या दिसत आहेत. या व्हिडीओखाली त्यांनी “आरामशीर रविवार…इंधन…रिचार्ज… आणि आराम…” असं म्हटलं आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. मात्र एका नेटकऱ्याने या व्हिडीओवर “असं कुठे कामाला जाता तुम्ही?, तुमचा रोजचाच रविवार असतो” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा –
नेटकऱ्याच्या याच कमेंटचा ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये उल्लेख केला असून त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. ऐश्वर्या यांनी “आम्ही रोज १३-१३ तास काम करतो. एकदा असं काम करुन बघा” असं म्हणत त्याला प्रतिउत्तर दिलं आहे. दरम्यान, ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली त्यांना अनेक सकारात्मक प्रतिक्रियाही आल्या आहेत. ऐश्वर्या नारकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, त्या सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काम करत आहेत.