झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेच्या कथानकाने व कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अजूनही खिळवून ठेवलं आहे. या मालिकेत त्रिनयना देवीचे गूढ रहस्य दाखवण्यात आले आहे. नुकतंच घरातील सदस्यांना अस्तिका कोण व त्रिनयना कोण याचा उलगडा झाला असून यामुळे मालिकच्या कथानकात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. नुकतीच या मालिकेत अस्तिकाची एंट्री झाली असून तिच्याकडे नागमणी असल्याचे दाखवण्यात आले आहे.
आस्तिकाला रुपालीचे सत्य माहित झाले असून तिने हे सत्य अद्वैतलादेखील सांगितले आहे. मात्र आता अस्तिका अद्वैतच्याच प्रेमात पडली आहे. मालिकेत अस्तिका अद्वैतच्या प्रेमात पडली असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अशातच आता यात आणखी एका नवीन ट्विस्टची भर पडली आहे. तो म्हणजे विरोचक अस्तिकाला तिच्या मनुष्य रूपात येण्यावरुन ओरडते. झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यात विरोचक अस्तिकालाच दोष देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये विरोचक अस्तिकाला मनुष्य रूपात येण्यावरुन तिच्यावर भडकते. यापुढे अस्तिका विरोचकाला नेत्रा तुमचा जीव घेणार असल्याचे सांगते. यापुढे विरोचक अस्तिकाला असं म्हणते की, “मला काहीही झालं नाही. मी त्या नेत्राला घाबरत नाही. ती नेत्रा व त्रिनयना मला काहीही करु शकत नाहीत. त्या दोघीही घाबरट आहेत. त्यांनी मला काही करायचं असतं, तर एव्हाना कधीच केलं असतं. पण त्यांनी तसं काहीही केलं नाही.”
दरम्यान, अस्तिका ही मनुष्यरूपात आल्यावरुन विरोचक याचा दोष तिलाच देते आणि तिने अद्वैतला अजून मारले का नाही? याबद्दल जाब विचारते. त्यामुळे आता पुढे आणखी नवीन काय ट्विस्ट पाहायला मिळणार? आगामी भागात अस्तिका अद्वैत-नेत्राचा जीव घेणार का? हे पाहणे प्रेक्षकांना उत्सुकतेचे ठरणार आहे.