झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकामागून एक नवनवीन ट्विस्ट हे येतच असतात. त्यामुळे मालिकेत येणारा प्रत्येक नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. मालिकेतील हे नवनवीन ट्विटस प्रेक्षकांना पाहण्याची उत्सुकता असते. अनेक उत्कंठावर्षक व रहस्यमय कथानकाने छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेने सर्वांची मनं जिंकली आहेत. मालिकेत येणारे नवनवीन ट्विटस हीच या मालिकेची जमेची बाजू आहे.
मालिकेत येणारे ट्विस्ट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. नुकताच रुपालीने राजाध्यक्ष कुटुंबातील फाल्गुनी व केतकी काकू यांना संमोहित केल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. संमोहित झाल्याने त्या दोघी वाटेल ते करत आहेत. संमोहित झाल्यामुळे फाल्गुनी व केतकी काकू स्वयंपाक घरातील सर्व भांडी बाहेर फेकून देतात. हातात येईल ते सामान त्या दोघी बाहेर फेकत आहेत. त्यामुळे त्यांना आवरण्यासाठी नेत्रा व इंद्राणीसह घरातील इतर मंडळी त्या दोघींना बांधून ठेवतात.
आणखी वाचा – दहावीत असताना पहिलं ब्रेकअप अन्…; विशाखा सुभेदारांचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाल्या, “प्रेमपत्र दिलं…”
त्या दोघींना बांधून ठेवल्याचे रुपालीला कळताच रुपाली केतकी व फाल्गुनीला अन्न-पाण्याचा त्याग करायला सांगते. कुणी काहीही दिलं तरीही तुम्ही ते खायचं नाही असं ती त्या दोघींनी सांगते. त्यामुळे त्या दोघीही काहीच खातपित नाहीत. यानंतर रुपाली पोलिसांना फोन करुन राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध तक्रार करते. त्यामुळे घरात पोलिस येतात आणि मग रुपाली राजाध्यक्ष कुटुंबीय घरातील व्यक्तींचा छळ होत असल्याचं म्हणते. यानंतर पोलिस घरी येताच रुपाली त्या पोलिसांनादेखील संमोहित करते.
आणखी वाचा – माहेरची साडी सेंटर, चाळ व मेट्रो स्टेशन, इतका भव्यदिव्य आहे डॉ. निलेश साबळेच्या नव्या शोचा सेट, पाहा व्हिडीओ
गेल्या भागात ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रेक्षकांना हे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता येत्या आगामी भागात नक्की काय पाहायला मिळणार? यांची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. रुपाली राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध पोलिसांचा कसा वापर करणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे आता मालिकेत पुन्हा काय नवीन ट्विस्ट येणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे.