शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुपालीचा अंत जवळ आला असल्याची इंद्राणीने दिली ताकीद, देवीआईकडून नेत्राला मिळाले शुभसंकेत, कथेत आणखी ट्विस्ट येणार

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 11, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi Serial new twist that Rupali's end is near know more

रुपालीचा अंत जवळ आला असल्याची इंद्राणीने दिली ताकीद, देवीआईकडून नेत्राला मिळाले शुभसंकेत, कथेत आणखी ट्विस्ट येणार

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत एकामागोमाग येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. रहस्यमय कथेवर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेचे कथानक, मालिकेतील कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका एका उंचीवर पोहोचली आहे. मालिकेत सध्या नेत्रा गरोदर असून तिच्या पोटात विरोचकाचा अंश वाढत असल्याचा नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. रुपालीने अद्वैतचे प्रतिबिंब तयार करुन ते नेत्राच्या खोलीत पाठवले होते. मग ते प्रतिबिंब नेत्राच्या पोटावर हात ठेवून मंत्र म्हणतं. याचदरम्यान रुपाली वीणा वाजवून नवीन शक्ती निर्माण करत असते.

त्यानंतर रुपाली तिच्या खोलीत जाऊन वीणाची तार तोडते. पुढे  नेत्राच्या पोटातील बाळ हे विरोचकाचंच अंश आहे. तिच्या पोटात दैवी असं काही नाही असं विरोचक रुपालीला सांगतो. घरात चाललेल्या या सर्व गोंधळातून मार्ग दाखवण्यासाठी नेत्रा देवीआईकडे प्रार्थना करते. नेत्रा एक आई म्हणून मी तुझ्याकडे माझ्या बाळाला सुखरुप ठेव अशी प्रार्थना करत आहे’ असं म्हणत प्रार्थना करते. नेत्राने देवीआईकडे प्रार्थना करताच देवाआईच्या दिशेकडून नेत्राकडे काही पाउलं चालत येतात. कुंकवाच्या पाऊलांद्वारे देवीआई नेत्राला नक्की काय संदेश देऊ पाहत आहे ही कळत नाहीये.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – अंबानी कुटुंबियांच्या लग्नात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला दिवसाचे मिळतात तब्बल इतके रुपये, ती व्यक्ती नक्की आहे तरी कोण?

अशातच आता या मालिकेचा आणखी  एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या नवीन प्रोमोमध्ये इंद्राणी रुपालीला आता ३ महिने झाले असून तुझ्या अंतासाठी फक्त आता सहाच महिने उरले आहेत. ज्यादिवशी नेत्राचे बाळ या जगात येईल, त्याचदिवशी तुझा वध होईल आणि तो दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. अशातच या प्रोमोच्याखाली “रुपालीचा अंत जवळ आलाय की काहीतरी वेगळंच घडणार?” असंही म्हटलं आहे.    

आणखी वाचा – जावयाने शत्रुघ्न सिन्हा यांना दिलं खास सरप्राईज, सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस दणक्यात केला साजरा    

दरम्यान, नेत्राच्या पोटात वाढत असलेलं बाळ हे विरोचकाचाच अंश आहे हे त्यांना अद्याप माहिती नाही. त्यामुळे आता नेत्राला याबद्दल कधी कळणार? देवीआई नेत्राला यातून काय नवीन मार्ग दाखवणार? आणि विरोचकाचा वध नक्की कुणाच्या हातून होणार? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.     

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
12 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

वृषभ, कन्या व मकर राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा, सामाजिक क्षेत्रात होणार प्रगती, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.