‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत एकामागोमाग येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. रहस्यमय कथेवर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेचे कथानक, मालिकेतील कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका एका उंचीवर पोहोचली आहे. मालिकेच्या कथानकातील एखादे वळण प्रेक्षकांना आवडले तर ते त्यावर आपली पसंती दर्शवतात, पण मालिकेतील एखादा ट्विस्ट आवडला नाही तर त्याबद्दलही प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी मालिकेतील नवीन ट्विस्टवर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मालिकेत सध्या नेत्रा गरोदर असून तिच्या पोटात विरोचकाचा अंश वाढत असल्याचा नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. रुपालीने अद्वैतचे प्रतिबिंब तयार करुन ते नेत्राच्या खोलीत पाठवले होते. मग ते प्रतिबिंब नेत्राच्या पोटावर हात ठेवून मंत्र म्हणतं. याचदरम्यान रुपाली वीणा वाजवून नवीन शक्ती निर्माण करत असते. तितक्यात रुपाली तिच्या खोलीत जाऊन वीणाची तार तोडते. पुढे नेत्राच्या पोटातील बाळ हे विरोचकाचंच अंश आहे. तिच्या पोटात दैवी असं काही नाही असं विरोचक रुपालीला सांगतो.
याच ट्विस्टबद्दल प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला नाही. त्यामुळे या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा नवीन ट्विस्ट पाहून एका प्रेक्षकाने “आता ही मालिका बघण्यात रस नाही” असं म्हटलं आहे. तर एकाने फालतूपणा सुरु आहे. उगाच गरज नसताना हा ट्विस्ट आणला आहे” असं म्हटलं आहे. तसेच हे विरोचक व नेत्रातील हे युद्ध अघोरी असल्याचेही अनेकांनी व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – ‘आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर ‘पाऊस’ वेबसीरिजची मोठी घोषणा, चित्रीकरणाला सुरुवात, कोणते कलाकार झळकणार?
याबद्दल “अघोरीपणा दाखवून काय मिळतं कुणास ठाऊक. त्यापेक्षा देवाधर्माच्या मालिका सुरु करा, म्हणजे लोक रात्री झोपताना शांत चित्तेने देवाचे नामस्मरण करत तरी झोपतील”, “मालिका सुरू झाली तेव्हा वाटलं ही थर्ड क्लास मालिका बंद करतील. पण तुम्ही तर निर्लज्ज आहात”, “एवढी नकारात्मकता फालतूपणाचा कळस गाठला आहे, हा मूर्खपणा बंद करा” अशा अनेक प्रतिक्रियांमधून प्रेक्षकांनी या नवीन ट्विस्टबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.