अभिनेत्री खुशबू तावडे सध्या खूप चर्चेत आहे. ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेमदेखील मिळाले आहे. या मालिकेत ती ‘उमा’ ही व्यक्तीरेखा साकारत होती. मात्र आता ती या मालिकेमध्ये पाहायला मिळणार नाही. तिने काही खास कारणासाठी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. ती या मालिकेत दिसणार नाही त्यामुळे तिचे चाहते खूप नाराज झाले आहेत. त्यानंतर तिने स्वतः ही मालिका सोडण्याचे कारण तिने चाहत्यांना सांगितले आहे. (Khushboo Tawde pregnant)
खुशबूने २०१८ साली अभिनेता संग्राम साळवीबरोबर लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०२१ साली तिने एका मुलाला जन्म दिला. मुलाबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर ती शेअर करत असते. अशातच आता पुन्हा एकदा आई होणार आहे. याबद्दलची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. तिने नवरा व मुलाबरोबर खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला तिचा नवरा संग्राम येतो. त्यानंतर खुशबू येते आणि नंतर मुलगा येतो. तिघांच्या एंट्रीच्या वेळेस त्यांची जन्मतारीख दिसते. त्यानंतर आता ऑक्टोबर २०२४ साली नवीन बाळ घरात येणार असं यामध्ये दाखवण्यात आलं आहे.
खुशबूने गरोदरपणामध्येही मालिकेमध्ये काम केले आहे. आठव्या महिन्यातही मालिकेमध्ये काम करत होती. मात्र आता तिला आरामाची गरज असल्याने तिने मालिकेतून ब्रेक घेतल्याचे सांगितलं आहे. दरम्यान आता ‘सारं काही…’या मालिकेमध्ये उमाचा प्रवास थांबला आहे. आता ही भूमिका पल्लवी वैद्य साकरणार आहे. या मालिकेमध्ये काम करण्याबाबतचा अनुभवदेखील शेअर केला आहे. ती म्हणाली की, “या मालिकेचा प्रवास असाच पुढे सुरु राहुदे. या मालिकेने मला खूप काही दिले आहे.
पुढे ती म्हणाली की, आता जरी या मालिकेमध्ये मी नसले तरीही ही मालिका तितकीच माझ्या जवळची राहणार आहे”. खुशबूच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, याआधी ती ‘तेरे बीन’, ‘आम्ही दोघी’, ‘गुड बॉय’ या मालिकांमध्ये काम करताना दिसली होती.