लेखक, कवी, अभिनेता व दिग्दर्शक अशा चारही क्षेत्रात मुशाफिरी करणारा संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा कलाकार आहे. नाटक, मालिका, चित्रपट त्याचबरोबर कवितांचे कार्यक्रम अशा माध्यमातून त्याने आपल्या कलेची चुणूक दाखवून दिली. नाटक, मालिका व चित्रपटांत अभिनय करत मनोरंजन करणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ तसेच त्याच्या कामाबद्दलची माहिती देत असतो.
अशातच अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने त्याच्या तिनंही नाटकांना पुरस्कार मिळाल्याची पोस्ट शेअर केली आहे. याबद्दल संकर्षणने खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. याबद्दल आनंदी भावना व्यक्त करत संकर्षणने असं म्हटलं आहे की, “‘नियम व अटी लागू’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट नाटक असे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तीन पुरस्कार मिळाले आहेत.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “लेखक म्हणुन सुखावणारा व अभिनेता म्हणुन आनंद देणारा अनुभव आहे. हे नाटक प्रेक्षकांनी व परिक्षकांनी इतकं छान स्विकारलं याबद्दल आनंद आहे. या नाटकाचे २१४ प्रयोग पूर्ण झाले असून अजून अनेक प्रयोग यशस्वी करायचे आहेत. यासाठी तुमची (प्रेक्षकांची) साथ कायम हवी”. यापुढे संकर्षणने निर्माते प्रशांत दामले, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, व सगळे साथीदार तसेच प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
संकर्षणच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्सद्वारे त्याचे कौतुक केले आहे. प्रसाद ओक, अमृता खानविलकर, अभिजीत खांडकेकर, अश्विनी कासार तसेच अनेक कलाकारांनी संकर्षणला अभिनंदन म्हटले आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीही या कामगिरीसाठी संकर्षणचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – मेष, वृषभ व कुंभ राशीच्या लोकांवर असणार शनिदेवाची कृपा, कुणाला होणार नेमका फायदा, जाणून घ्या…
दरम्यान, संकर्षणचे रंगभूमीवर सध्या ‘नियम अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांसह त्याचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रमही सुरू आहे. तसेच त्याच्या नाटकांना व कवितांच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसादही मिळत आहे.