नव्या मालिकांच्या शर्यतीत ही आई कुठे काय करते या मालिकेने स्वतःचे स्थान टिकवून ठेवले.याच कारण कलाकारांच्या अभिनयातील सहजता,मालिकेचे कथानक आणि वेगवेगळ्या टप्यावर मालिकेत येणारी नवीन वळण यांनी मालिकेचा प्रेक्षक टिकवून ठेवला आहे.(Sanjana Slap Anirudh)
संजनाच्या वाढदिवसादिवशी अनिरुद्धने तिचा दिवस खराब केला. अनिरुद्धच्या या वागण्याला संजना कटांळून गेली आहे. आजवर इतक्या गोष्टी घडल्या तरी देशमुखांच घर सोडण्याचा विचार संजनाच्या मनात कधी आला नाही, परंतु या वेळेस हतबल होऊन संजनाला घर सोडावस वाटत परंतु अरुंधती तिला समजावते.
पाहा काय घडलं आजच्या भागात? (Sanjana Slap Anirudh)
आजच्या भागात संजना निखिल सोबत फोनवर बोलत असते, तेव्हा अनिरुद्ध तिकडे येतो, आणि संजनाला म्हणतो मी तुला काही गिफ्ट दिल नाही तर हे पैसे घे.ते पैसे बघून संजनाची चिडचिड होते. आणि वीणाला अनिरुद्धने जे काही संजना बदल खोट सांगितलं आहे त्याचा जाब संजना अनिरुद्धला विचारते. त्यांच्यात वाद होतात, तेव्हा अनिरुद्ध पुन्हा खालच्या थराला जाऊन संजनाबद्दल बोलतो. ते सहन न झाल्यामुळे संजनाचा अनिरुद्धवर हात उचलला जातो, परंतु ही गोष्ट ही तो तिच्या विरोधात वापरेल असा विचार करून संजना स्वतःला थांबवते.(Sanjana Slap Anirudh)

दुसऱ्या दिवशी, देशमुखांकडे सर्व जानकी सोबत खेळत असतात. तेव्हा सुलु ताई तिकडे येतात. आणि त्यांना बघून कांचन ताईंना खूप आनंद होतो. सुलूताई देखील संजनाच्या मॉडेलिंग करण्याबद्दल विचारपूस करतात. तर केळकरणाकडे सुलेखा ताई, अरुंधती आणि वीणा म्युझिक स्कुल आणि आश्रमात गेलेल्या असतात. तेव्हा सुलेखा ताई आणि अरुंधती करत असल्येल्या कामाचं वीणाला कौतुक वाटत.
हे देखील वाचा : राज-कावेरीवर हल्ला-कावेरीचा जीव धोक्यात?