सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे सध्या चर्चेत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या मागील आठवड्याच्या भागामध्ये समीर यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शाहरुख खान, ड्रग्ज प्रकरण, खासगी आयुष्य अशा अनेक विषयांवर ते खुलेपणाने बोलले. यावेळी त्यांनी इतर ड्रग्ज प्रकरणामध्ये कारवाई करत असताना आलेल्या अनुभवांबाबत सांगितलं.
समीर वानखेडे व त्यांच्या टीमने मानखुर्द येथे उघडपणे ड्रग्जची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. यादरम्यान गुन्हेगारांनी समीर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हेगार हल्ला करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून आले. मात्र त्याचक्षणी समीर यांचे सहकारी त्यांना वाचवण्यासाठी पुढे आले. याचबाबत समीर यांनी या कार्यक्रमात सांगितलं आहे.
आणखी वाचा – “आई-वडिलांचा घटस्फोट झाला अन्…”, आमिर खानच्या लेकीचा आजारपणाबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या आजारासाठी ”
ते म्हणाले, “मानखुर्दला एक ऑपरेशन झालं होतं. तिथे एक नायझेरियन गँग होती. ते उघड्यावर ड्रग्ज विकायचे. त्यांनी आपल्या महाराष्ट्र पोलिसांवरही याआधी हल्ला केला होता. माझा एक सहकारी कॉन्स्टेबल पीएसओ होता त्याचं नाव होतं श्रीकांत. त्याचं नाव मी नेहमीच गर्वाने घेतो. आम्ही तिथे जेव्हा पोहोचलो तेव्हा तो नायझेरियन माझ्यावर हल्ला करण्यासाठी कोयता घेऊन धावत येत होता”.
आणखी वाचा – “माझं नाव वापरु नकोस”, नियम मोडणाऱ्या क्रांती रेडकरची समीर वानखेडेंनी केलेली कानउघडणी, म्हणाले, “अशा फालतू…”
“त्यावेळी मला वाचवण्यासाठी श्रीकांत स्वतःमध्ये आला. दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अजूनही असे अधिकारी आपल्या सरकारमध्ये आहेत ज्यांच्यामध्ये राष्ट्रभाव, देशभक्ती आहे. फक्त पैसे त्यांच्यासाठी प्रेरणा नाहीत”. समीर यांनी सांगितलेली ही घटना अंगावर काटा आणणारी आहे.