शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘छबी’ चित्रपटाचा थरारक टीझर समोर, कथेला हॉरर टच, दमदार कलाकारांसह मराठीमध्ये नवा प्रयोग

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 12, 2025 | 12:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chhabi Teaser

'छबी' चित्रपटाचा थरारक टीझर समोर, कथेला हॉरर टच, दमदार कलाकारांसह मराठीमध्ये नवा प्रयोग

Chhabi Teaser : कोकण म्हणजे स्वर्ग. आणि या स्वर्गात येण्यासाठी प्रत्येकजण वेळात वेळ काढतो आणि कोकण गाठतो. आजकाल तर चित्रपट, मालिकांमुळे या कोकणचे सौंदर्य लाखो-करोडो लोकांपर्यंत पोहोचले आहे. विविध चौफेर बाजूंनी घेतलेले फोटोग्राफ्स या सौंदर्यात भर घालण्यात मदत करतात. आता अशातच कोकणची फोटोग्राफी करायला आलेल्या एका फोटोग्राफरला त्याच्या नजरेत हे सौंदर्य नेमकं कसं वाटत हे लवकरच मराठमोळ्या ‘छबी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कोकणात फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरला आलेल्या गूढरम्य अनुभवाची थरारक गोष्ट ‘छबी’ या चित्रपटातून उलगडणार आहे.

‘छबी’ या चित्रपटाचा अतिशय रंजक टीझर लाँच करण्यात आला असून, हा चित्रपट ९ मेपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ‘केके फिल्म्स क्रिएशन’, ‘उप्स डिजिटल एंटरटेन्मेेंट’ यांनी ‘छबी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जया तलक्षी छेडा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांच असून त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश दाभणे , अपूर्वा कवडे या नव्या दमाच्या कलाकारांसह अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे, अभिनेत्री शुभांगी गोखले, राजन भिसे, जयवंत वाडकर,संकेत मोरे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार आहेत. त्यामुळे चित्रपटाची अभिनयाची बाजू खणखणीत आहे यात शंका नाही.

आणखी वाचा – ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा विजेता ठरला गौरव खन्ना, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

फोटोग्राफी स्पर्धेसाठी एक तरुण फोटोग्राफर कोकणातल्या गावात फोटो काढतो. मात्र त्या फोटोमध्ये कुणीच नसतं. हे असं का झालं याचा नाट्यमय शोध ‘छबी’ या चित्रपटात आहे. गूढरम्य आणि नावीन्यपूर्ण कथानक, परिणाकारक पार्श्वसंगीत यामुळे हा टीझर प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, तसंच चित्रपटाविषयी उत्सुकताही वाढवतो. आजवर चित्रपटांमधून फोटोग्राफरची, एखाद्या फोटोची गोष्ट फारशी मांडली गेलेली नाही. अशा कथानकाला गूढरम्यतेची पार्श्वभूमी असल्यानं ‘छबी’ हा सध्याच्या चित्रपटांमध्ये नक्कीच वेगळा प्रयत्न ठरणार आहे. या गूढरम्यतेचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी आता ९ मेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Tags: chhabi marathi movieChhabi Teasermarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sankarshan Karhade Shared Special Post

बैल आजारी कळताच वडील परभणीत तडकाफडकी निघाले अन्…; संकर्षण कऱ्हाडेने सांगितला प्रसंग, म्हणाला, "देवाचा धावा करुन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.