बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tiger 3 Trailer : अंगावर काटा आणणारा ‘टायगर ३’चा ट्रेलर प्रदर्शिता, सलमान खानपेक्षा कतरिना कैफचीच रंगली चर्चा, काही मिनिटांमध्ये लाखो व्ह्युज

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 16, 2023 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tiger 3 Trailer Out

Tiger 3 Trailer : अंगावर काटा आणणारा 'टायगर ३'चा ट्रेलर प्रदर्शिता, सलमान खानपेक्षा कतरिना कैफचीच रंगली चर्चा, काही मिनिटांमध्ये लाखो व्ह्युज

‘पठाण’, ‘जवान’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशांनंतर प्रेक्षकही धमाका करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. अशातच सलमान खानच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. इतकंच नव्हे तर त्याच्या आगामी ‘टायगर ३’ चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने कमी वेळातच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सलमान खानचे चाहते ‘टायगर ३’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच चाहत्यांसाठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Tiger 3 Trailer Out)

“देश के अमन और देश और दुश्‍मनों के बीच कितना फासला है… सिर्फ एक आदमी का। टाइगर।” टायगर ३’चा ट्रेलर या दमदार ओळीने सुरू झालेला पाहायला मिळतोय. आणि ‘जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं…’ या संवादाने ट्रेलरचा शेवट होतो. या दोन्ही संवादांमध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या मिशनची ताकदवान कथा पाहायला मिळतेय. ही कथा थेट पाकिस्तानशी जोडली गेली असल्याची चर्चा आहे. ‘यशराज फिल्म्स’च्या या चित्रपटाच्या ट्रेलरने खरोखरच सोशल मीडियावर धमाका केला आहे.

आणखी वाचा – ‘सिंघम अगेन’मध्ये महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार दीपिका पदुकोण, लूक पाहून नवऱ्याची मराठीत पोस्ट, म्हणाला, “आली रे आली…”

ऍक्शन-थ्रिलर चित्रपट ‘टायगर ३’ चे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. ‘यशराज फिल्म्स’च्या बॅनरखाली आदित्य चोप्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सलमान, कतरिना व इम्रान मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ‘एक था टायगर’ (२०१२) आणि ‘टायगर जिंदा है’ (२०१७) चा सिक्वेल आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘टायगर ३’ च्या नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, देशाचे रक्षण करणारा रॉ एजंट अविनाश सिंह राठौर पुन्हा एकदा एका मिशनवर निघाला आहे, पण हे मिशन त्याच्या ओळखीचे असल्याचं कळतंय. अविनाश उर्फ ​​टायगर ज्याने आयुष्याची २० वर्षे भारताच्या रक्षणासाठी घालवली, तो देशद्रोही व शत्रू असल्याचं खोटे आरोप त्यावर करण्यात आले आहेत. आता आपल्या देशाला व कुटुंबाला वाचवण्यासाठी हा टायगर कोणते प्रयत्न करणार हे पाहणं चित्रपटात रंजक ठरेल.

आणखी वाचा – सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर येणार का?, जोगतीण नेमकं काय सांगणार?, नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

या चित्रपटात कतरिना कैफने झोयाची भूमिका साकारली असून ती माजी आयएसआय एजंट आणि टायगरची पत्नी आहे. तर इमरान हाश्मी नकारात्मक भूमिकेत आहे. या चित्रपटात रेवती, रिद्धी डोगरा, विशाल जेठवा, कुमुद मिश्रा, रणवीर शौरी यांच्याही भूमिका आहेत. तसेच शाहरुख खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Tags: bollywood movieentertainmentimran hashmikatrina kaifsalman khantiger 3tiger 3 trailerTiger 3 Trailer Out
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Big boss session 17 premier night ex-couple accusation

Big boss session 17 : चेहऱ्यावर नखं मारली, शारीरिक हिंसाचार अन्…; 'बिग बॉस १७'च्या घरात एक्स कपलचे एकमेकांवर गंभीर आरोप, सलमान खानही हैराण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.