शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खान गोळीबाराचे बिश्नोई कनेक्शन, मारण्यासाठी थेट पाकिस्तानातून मागवली होती शस्त्रे अन्…; नेमकं प्रकरण काय?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 2, 2024 | 10:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Salman Khan shooting case Panvel police filed charge sheet Lawrence Bishnoi group given details of a conspiracy to kill him

सलमान खान गोळीबाराचे बिश्नोई कनेक्शन, मारण्यासाठी थेट पाकिस्तानातून मागवली होती शस्त्रे अन्...; नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यानंतर मुंबई पोलिस यंत्रणेने तपास सुरु करून दोन दिवसांतच गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला. विकी गुप्ता व सागर पाल अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नाव होती. या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती. अशातच या प्रकरणी नुकतीच एक नवीन बातमी समोर आली आहे. पनवेल पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई ग्रुपच्या सदस्यांनी सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचे तपशील दिले आहेत. गेल्या आठवड्यात पनवेल दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या ३५० पानांच्या आरोपपत्रात सलमान खानला मारण्याच्या कटाबद्दलची सर्व माहिती उघड झाली आहे.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किंवा सलमान खान त्याच्या पनवेल फार्महाऊसमधून बाहेर पडताना त्याच्यावर हल्ला करण्याचा प्लॅन होता, असे त्यात म्हटले आहे. ‘TOI’मधील एका वृत्ताप्रमाणे, सलमान खानला पाकिस्तानमधून अत्याधुनिक शस्त्रे वापरुन मारण्याची योजना उघड झाली आहे. ज्यात मोबाईल फोन, व्हॉट्सॲप ग्रुप बनवणे, टॉवर लोकेशन आणि ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचची तांत्रिक तपासणी समाविष्ट आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

आणखी वाचा – मेष, मिथुन व मीन राशीच्या लोकांना मंगळवारी नोकरी, व्यवसायात होणार चांगलाच फायदा, काय आहे आजच्या दिवसाचे महत्त्व, जाणून घ्या…

आरोपपत्रात धनंजय तापसिंग उर्फ ​​अजय कश्यप, गौतम विनोद भाटिया, वास्पी महमूद खान उर्फ ​​चेना, रिजवान हसन उर्फ ​​जावेद खान आणि दीपक हवासिंग उर्फ ​​जॉन वाल्मिकी यांच्यासह बिश्नोई टोळीतील आणखी पाच सदस्यांची नावे आहेत. पनवेलचे पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना सलमान खानवर नियोजित हल्ल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला तपास सुरु झाला.

आणखी वाचा – त्रिनयना देवीने नेत्राच्या ओटीत दिलेल्या वस्त्राचं नेमकं रहस्य काय? देवी आई लेकींना नवीन मार्ग दाखवणार का?

या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या टोळीतील सदस्यांना २५ लाखांचे कंत्राट दिल्याचे उघड झाले आहे. या टोळीने १५-१६ जणांशी एका व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे संपर्क साधला होता, ज्यात बिश्नोईचा कॅनडामध्ये असलेला चुलत भाऊ अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार, अजय कश्यप, विनोद भाटिया, वास्पी मेहमूद खान उर्फ ​​चायना आणि रिझवान हसन खान यांचा समावेश होता. पाकिस्तानातील सुखा शूटर आणि डॉगर यांच्याकडे AK-47, M16 किंवा M5 सारखी शस्त्रांची पोलिसांनी ओळख पटवली आहे.

Tags: Salman Khan Shooting CaseSalman Khan Shooting Case Marathi NewsSalman Khan Shooting Case News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aishwarya Narkar On Trolling

"नवरा योगाला नाही फक्त नाचायच्या वेळेसच असतो?", ऐश्वर्या नारकरांनी कमेंट करणाऱ्याची केली बोलती बंद, म्हणाल्या, "स्वतःची लायकी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.