शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सैराट’च्या आर्चीची स्वप्नपुर्ती! स्वकमाईतून घेतली नवीन आलिशान कार, फोटो शेअर करत म्हणाली, “माझं नवीन प्रेम…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 9:54 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sairat fame actress Rinku Rajguru bought a new car and she has shared some special photo on social media.

'सैराट'च्या आर्चीची स्वप्नपुर्ती! स्वकमाईतून घेतली नवीन आलिशान कार, फोटो शेअर करत म्हणाली, "माझं नवीन प्रेम..."

‘सैराट’ या पहिल्याच चित्रपटातून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगूरु. रिंकूला ‘सैराट’ चित्रपटातील ‘आर्ची’ या नावानेदेखील ओळखलं जातं. सैराटनंतर रिंकूने अनेक चित्रपट व सीरिजमधून काम केलं आहे. पण तिला आजही ‘सैराट’मुळेच अधिक ओळखलं जातं. आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी ही अभिनेत्री सध्या एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे रिंकूने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. या नवीन कारचे काही खास फोटो तिने सोशल सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. रिंकूने आपल्या सोशल मीडियावर कारबरोबर खास फोटो काढत आपल्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

रिंकू राजगुरुने तिच्या आयुष्यातील पहिली कार नुकतीच खरेदी केली आहे. या आलिशान गाडीचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी नव्या गाड्या घेत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये आता रिंकूचं नावदेखील जोडलं गेलं आहे. नव्या आलिशान कारबरोबरचे फोटो शेअर करत रिंकूने असं म्हटलं आहे की, “पहिली गाडी ही कायम खास असते. हक्काची पहिली गाडी खरेदी करण्याची भावना काहीतरी वेगळीच असते. जी तुम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ही गाडी म्हणजे माझं नवीन प्रेम आहे”.

View this post on Instagram

A post shared by Rinku Asha Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

आणखी वाचा – ऋषी कपूर यांच्या निधनावेळी लेक रणबीर कपूर रडला नव्हता, अभिनेत्याने पहिल्यांदाच केले भाष्य, म्हणाला, “खंत वाटते की…”

पांढऱ्या रंगाच्या आलिशान कारबरोबर रिंकूने ट्विनिंग करत फोटोशूट केलं आहे. रिंकूने नवीन कारबरोबरचे फोटो शेअर करताच चाहत्यांनी व मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्वप्नील जोशी, छाया कदम, ऋतुजा बागवे, सायली संजीव, प्रार्थना बेहेरे यांसह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत रिंकूला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “आमचं ठरलंय” म्हणत अक्षया देवधरने सांगितली गुडन्यूज, खास पोस्टही शेअर केली अन्…; म्हणाली, “लवकरच…”

दरम्यान,  ‘सैराट’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर रिंकूने एकामागोमाग एक अनेक चित्रपटांत काम केले. मराठी सिनेसुष्टीसह अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटात रिंकू महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचंही भरभरुन कौतुक करण्यात आलं

Tags: marathi entertainment newsrinku rajguruRinku Rajguru New Car
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Grand Premiere is started

Bigg Boss Marathi 5 Grand Premiere : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला सुरुवात, कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार?, उत्सुकता शिगेला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.