‘बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफुल’ अशी आपली वेगळी ओळख निर्माण करुन प्रेक्षकांच्या मनात घर केलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मराठी, हिंदीसह सईने इतर भाषांत अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे जितकी चर्चेत असते. तितकीच ती तिच्या स्टायलिश फोटोंमुळेदेखील कायम चर्चेत राहत असते. सई ही नेहमीच तिच्या अनोख्या व वेगवेगळ्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहत असते. तिचा हा स्टायलिश अंदाज अनेक चाहत्यांना आवडतो तर काहींना तो आवडतही नाही. अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमुळे तर सोशल मीडियावर सध्या तिचीच चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. (Saie Tamhankar On Instagram)
नुकतंच सई ताम्हणकर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सईने चॉकलेटी कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला असून त्यावर पांढऱ्या रंगाचे ओपन जॅकेट परिधान केले आहे. सईने नुकतंच केलेल्या या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर व बोल्ड दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट्स करत तिच्या फोटोंना पसंती दर्शवली आहे तर काहींना मात्र हे मुळीच पटलेले नाही. तिचे बोल्ड पाहून काही नेटकरी चांगलेच भडकले आहेत. अनेकांनी तिला खडेबोलदेखील सुनावले आहेत.
सईच्या या फोटोंखाली नेटकऱ्यांनी “अरे बाबा… तूम्ही एक बाई आहात आणि त्यात तूम्ही मराठी घराण्यात जन्माला आला आहात… शोभत का तुम्हाला असं विचित्र फोटो अपलोड करायला आणि काढायला?, महाराष्ट्राची संस्कृती बघा कोणत्या पातळीवर नेली आहे या मॅडमने?, आजच्या स्टोरीमधे पहिलाच फोटो तुम्ही सावित्रीबाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन फोटो तुमच्या स्टोरीला लावलात आणि थोड्याच वेळात तुम्ही हे असले फोटो टाकता?, मराठी संस्कृती जपली पाहिजे सई-बाई” अशा अनेक् कमेंट्स करत तिला ट्रोल केले आहे.
आणखी वाचा – “आमचे एकत्र फोटो…”, सिद्धार्थ बोडकेबरोबरच्या नात्यावर तितिक्षा तावडेचा खुलासा, म्हणाली, “गेली अनेक वर्ष…”
तसेच मराठीतील काही कलाकारांनी या फोटोंवर कमेंट्स करत सईच्या या फोटोंचे कौतुक केले आहे. प्रार्थना बेहेरे, ऋतुजा बागवे, मधुराणी प्रभूलकर, क्रांती रेडकर, भक्ती देसाई या अभिनेत्रींनी कमेंट्सद्वारे सईच्या फोटोंना पसंती दर्शवली आहे. दरम्यान लवकरच सईचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार असून यात तिच्याबरोबर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही दिसणार आहे.