मानवी शरीराला, मनाला होणाऱ्या यातनांना शांत करण्यासाठी गरज असते निखळ हास्याची आणि प्रेक्षकांना या हास्याची ओळख करून देणारा एक असाच अवलिया म्हणजे कलाकार सचिन गोस्वामी. (Sachin Goswami)
पांढऱ्या केसांचा राजकुमार अशी ओळख असलेल्या गोस्वामींचा आज वाढदिवस. काही कलाकारांची तगडी फौज एकत्र करून साथीदारांच्या मदतीने ‘महाराष्ट्राच्या हास्य जत्रेची’ निर्मिती करण्यात सचिन गोस्वामी यांच ही मोलाचं योगदान आहे. डोक्यात असणारा विनोद कागदावर आणि कागदावरचा विनोद स्टेज वर उतरवण्या पर्यंत डोळ्यात तेल घालून कार्यरत असणारे सचिन गोस्वामी त्यांच्या ध्येयाने वेढावलेले दिसतात.

विनोद ही गोस्वामींची जमेची बाजू असल्याचं त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दी वरून दिसून येत. हास्य जत्रेआधी फु बाई फू सारखा विनोदी कार्यक्रम असो किंवा एक डाव भटाचा, धूम टू धमाल, मस्त चाललंय आमचं यांसारखे तुफान विनोदी चित्रपट असो हास्यनिर्मिती हा या कलाकृतींचां मूळ उद्देश दिसून आला आहे.तर मंडळी सध्या सगळीकडे चर्चा आहे हास्यजत्रेची आणि या चर्चेला कारणीभूत असणार महत्वाचं नाव आहे सचिन गोस्वामी. (Sachin Goswami)

कोरोना काळात जनतेला आधार किंवा गरज म्हणलं तरीही हरकत नाही जी होती काही क्षण सार विसरून जाण्याची आणि हे उत्तम काम केलं ते हास्य जत्रेतील या सर्व कलाकारांनी. स्वतः आपल्या घरापासून लांब राहून शूट केलेले एपिसोड प्रेक्षकांना आधार देतायत हे पाहून या कार्यक्रमाचे कलाकार, निर्माते आणि सगळेचजण सुखावत होते.
====
हे देखील वाचा – IIT मद्रासमध्ये घुमणार ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ नावाचं वादळ
====
काय आहे गोस्वामींचं स्वप्न?(Sachin Goswami)
हे झालं सचिन गोस्वामी यांच्या निर्मितीचं उत्तम उदाहरण पण या कामा व्यतिरिक्त गोस्वामींना काय करायला आवडलं असत असा प्रश्न इट्स मज्जाच्या मुलाखतीत मज्जागर्ल अंकिता लोखंडे ने विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरादखल मी जेव्हा या कार्यकाळातून निवृत्त होईन तेव्हा गोस्वामी पाणीपुरी सेंटर सुरू करेन एवढं नक्की अस सचिन गोस्वामी म्हणाले होते. सचिन गोस्वामी यांना लहानपणापासूनच पणीपुरीच प्रचंड वेड असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं.
हास्यजत्रेमुळे खरी ओळख मिळालेले अनेक चेहरे आज त्यांच्या यशामागे सचिन गोस्वामी कायम राहिल याची ग्वाही देत राहतील एवढं नक्की. फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता गोस्वामींची हि किमया प्रदेशात हि अगदी उत्सुकतेनं बघितली, नावाजली जाते. एक कलाकार म्हणून ते अतिशय सामंजस्य आहेतच पण एक माणूस म्हणूनही ते किती मन मिळावु आहेत याचा प्रत्येय त्यांचीशी बोलून येतो. पुन्हा एकदा या बहुरूपी कलाकाराला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.