शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

त्रिनयना देवीने नेत्राला दिली नवीन शक्ती, विरोचकाला नवीन शक्तीबद्दल कळणार का?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 1, 2024 | 9:38 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update Trinayana Devi gives Netra a new power

त्रिनयना देवीने नेत्राला दिली नवीन शक्ती, विरोचकाला नवीन शक्तीबद्दल कळणार का?

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत आतापर्यंत घरातील सर्वांना विरोचकाच्या प्रतिबिंब शक्तीबद्दल माहिती झाली आहे. त्यामुळे घरातील सर्वजण सतर्क झाले आहेत. समोर आलेली व्यक्ती ही खरी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीचं प्रतिबिंब आहे हे ओळखण्यासाठी राजाध्यक्ष कुटुंबियांनी ‘मी काय म्हणते’ किंवा ‘मी काय म्हणतो’ या सांकेतिक वाक्याचा वापर करण्याचे नियोजन केलं आहे. अशातच त्रिनयना देवीने एका वृद्ध महिलेच्या रुपात येऊन नेत्राची ओटी भरली आहे आणि या ओटीत तिला एक वस्त्र दिले आहे. जे वस्त्र एक ध्वज आहे आणि यावर एका बाजूला देवीचे चिन्ह आहे तर दुसऱ्या बाजूला विरोचकाचे चिन्ह आहे. आजच्या भागात देवीआईने हे वस्त्र देण्यामागे नक्की काय हेतू असेल? देवीआई नक्की काय सांगायचा प्रयत्न करत आहे. हे त्यांना कळत नाही आहे.

अशातच विरोचक मात्र नेत्राला कोणती तरी नवीन शक्ती मिळाली आहे, या विचारात त्याच्याविरुद्ध कसं लढावं याचा विचार करत आहे. याच विचारात तो नेत्राच्या खोलीत जातो. तेवढ्यात केतकी काकू येतात आणि नेत्रा-अद्वैतला सावध करतात. मग लगेच नेत्रा व अद्वैत खोलीत जातात. त्यानंतर विरोचक नेत्राला धमकवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र नेत्राही विरोचकाला न घाबरता तिच्याविरुद्ध आवाज उठवते. त्यामुळे विरोचक नेत्राला घाबरुन खोलीतून पळून जातो.

आणखी वाचा – सिंह, मेष व कर्क राशीसाठी सोमवारचा दिवस असणार फारच खास, नोकरी-धंद्यात मिळणार चांगलं यश,जाणून घ्या…

त्यामुळे विरोचक नेत्राला नक्की कोणती शक्ती मिळाली आहे? नेत्राच्या ओटीत देवीआईने नक्की काय दिलं आहे? हे बघण्यासाठी विरोचक शेखरचे प्रतिबिंब तयार करतो आणि त्याला नेत्राच्या ओटीतील सामान नक्की काय होतं याची माहिती करुन घेण्यासाठी जायला सांगतो. त्यानुसार शेखरचे प्रतिबिंब केतकी काकूच्या खोलीत जाऊन ओटीतील सामानाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र ते हे प्रतिबिंब असल्याचे समजून जातात आणि मग तेजस सावधपणे अद्वैतला त्यांच्या खोलीत बोलावतो.

आणखी वाचा – “नागराज मंजुळेची ती कलाकृती मिळाली असती तर…”, बऱ्याच वर्षांनी कमबॅक करणाऱ्या मिताली जगताप यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, “संधी हुकली कारण…”

त्यानंतर अद्वैत, नेत्रा, इंद्राणी व शेखर हे सगळेच धावत फाल्गुनीच्या खोलीत येतात. तेव्हा ते शेखरचे प्रतिबिंब बघतात आणि त्यांना धक्काच बसतो. त्यामुळे आता खरी व्यक्ती व प्रतिबिंब एकमेकांसमोर आल्यामुळे काय होणार? विरोचक त्याची खेळी खेळणार का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

Tags: marathi entertainment newsMarathi Serials NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Paaru Serial Update

अहिल्यादेवींचा राग अनावर, आदित्यला दिली मोठी शिक्षा, तर मोहनने दामिनीलाही काढलं घराबाहेर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.