बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नागराज मंजुळेची ती कलाकृती मिळाली असती तर…”, बऱ्याच वर्षांनी कमबॅक करणाऱ्या मिताली जगताप यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, “संधी हुकली कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 30, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mitalee Jagtap Incident

"नागराज मंजुळेची ती कलाकृती मिळाली असती तर…", बऱ्याच वर्षांनी कमबॅक करणाऱ्या मिताली जगताप यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, "संधी हुकली कारण…"

‘अबीर गुलाल’ या नुकत्याच सुरु झालेल्या मालिकेतून अभिनेत्री मिताली जगताप प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ‘वादळवाट’, ‘एक धागा सुखाचा’ सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करणाऱ्या मिताली जगताप मधल्या काळात दिसेनाश्या झाल्या. त्यानंतर ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मिताली पुन्हा एकदा चर्चेत आल्या. मात्र त्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा मालिकाविश्वातून काढता पाय घेतला. आता त्याच जोमाने अभिनेत्री पुन्हा सिनेसृष्टीत कार्यरत झाली आहे. (Mitalee Jagtap Incident)

नुकतीच त्यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी या मधल्या काळाबाबत बरंच भाष्य केलं. मिताली जगताप यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, “खूप कालावधीनंतर तुम्ही सिनेविश्वात कमबॅक केलं आहे. या मधल्या काळात चित्रपट/ मालिकांसाठी विचारणा झाली नाही का?”. याचं उत्तर देताना मिताली यांनी हुकलेल्या संधीची खंत व्यक्त केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “२०१२ पासून माझ्या मनात एक गोष्ट आहे आता ती बोलू की नको असं मला वाटतं आहे. एक सुंदर अशी कलाकृती होती.

आणखी वाचा – “राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आणि…”, वडिलांच्या आजारपणाबाबत बोलताना मिताली जगतापला अश्रू अनावर, म्हणाली, “ते कोमात…”

त्या म्हणाल्या, “दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची ती कलाकृती होती. त्यामध्ये मी काही वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. अगदीच उद्या चित्रीकरण आहे आणि आदल्या रात्री मी नाही येऊ शकत असं सांगितलं. कारण माझी मुलगी आजारी होती. जर ती एक कलाकृती मी केली असती तर माझ्या आयुष्यात खूप काही झालं असतं. आताची पिढी ही थोडीशी प्रॅक्टिकल आहे. मी संभाजी नगरसारख्या शहरातून मुंबईत एकटी आले. खूप कष्ट करुन मी स्वतः स्थान निर्माण केलं. लग्नानंतर माझ्या आयुष्यात एक सोनेरी काळ आला. तो म्हणजे मी आई झाले. एक कलाकार म्हणून मी या गोष्टीला भारावून जायला नको होतं जे मी गेले. माझ्यासाठी माझी लेक पहिलं प्राधान्य आहे. ज्यावेळी असं वाटलं की त्या छोट्याश्या जीवाला माझी गरज आहे तेव्हा मी कसलाच विचार केला नाही”.

आणखी वाचा – एजे-लीलाच्या रिसेप्शनला खास पाहुण्यांची उपस्थिती, धमाल डान्स करत वाढविली शोभा, पारंपरिक लूकचीही चर्चा

पुढे त्या म्हणाल्या, “माझा नवराही याच क्षेत्रात आहे. आम्हीच सकाळी ७ ला घर सोडलं तर रात्री ११ ला घरी येणार. त्यामुळे माझं इतकंच म्हणणं होतं की, आम्हा दोघांपैकी एकाचा चेहरा तरी तिला दिसावा. अशावेळी मी नवऱ्याला म्हटलं की तू कर मी ब्रेक घेते. ज्यावेळी तिला माझी गरज पडली तेव्हा मी तिच्याबरोबर होते त्यामुळे करिअरमधील एक संधी मला सोडावी लागली. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. अशावेळी बरंच काही शिकायला मिळतं. परिस्थिती हाताळायला शिकता”.

Tags: entertainmentmarathi actressMitalee Jagtap Incidentmitalee jagtap serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
01 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

सिंह, मेष व कर्क राशीसाठी सोमवारचा दिवस असणार फारच खास, नोकरी-धंद्यात मिळणार चांगलं यश,जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.