‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या आजच्या भागात इंद्राणी व केतकी काकू यांना स्वयंपाकघरात कुणी तरी असल्याचे जाणवते. त्यामुळे आतमध्ये कोण आहे ते बघण्यासाठी जातात. तर तिथे रुपाली जेवण करत असल्याचे त्यांना दिसते. तिला जेवण करताना बघून दोघींना आश्चर्य वाटते. यानंतर रुपाली केतकी काकूला घरातील कोणताच बदल मला आवडला नसला तरी तुझ्यात झालेला एक बदल मला आवडला तो म्हणजे तू दारू सोडली हा बदल. केदार अचानक गायब झाल्यानंतर तू दारू प्यायला लागलीस. पण आता तू दारु पित नाहीस हे बघून छान वाटलं असं ती म्हणते.
पुढे नेत्रा व अद्वैत हे डॉक्टरकडे नेत्राच्या तपासणीसाठी जातात. तेव्हा डॉक्टर त्यांना सारं काही ठीक सुरू असून नेत्राला काळजी करण्याची सूचना देतात. त्याचबरोबर गरोदरपणात घेतल्या जाणाऱ्या सुचनांविषयी त्या तिला समजावून सांगतात. यादरम्यान डॉक्टर नेत्रा-अद्वैतकडे रुपालीविषयीची विचारपूसही करतात. पुढे दवाखान्यातुन बाहेर आल्यानंतर अद्वैत मला तुझ्यासारखी मुलगीच झाली पाहिजे आणि राजाध्यक्षांच्या घरात लक्ष्मी आली पाहिजे असं म्हणतो. इतक्यात त्यांना कावळ्यांचा आवाज येतो. झाडावर एकही कावळा नसताना त्यांना हा आवाज का येत आहे म्हणून त्यांना चिंता वाटते.
आणखी वाचा – राजयोगामुळे मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे अगदीच खास, काय असणार तुमच्या नशिबात?, जाणून घ्या…
त्यानंतर नेत्रा-अद्वैत शेखर व इंद्राणी यांना ही खुशखबर देतात. त्यामुळे दोघेही आनंदी होतात. इतक्यात केतकी काकू तिथे येते आणि तिलाही आनंदाची बातमी दिली जाते. मात्र विरोचकापर्यंत ही गोष्ट पोहोचू नये म्हणून ते फाल्गुनी व तन्मयपासून ही गोष्ट लपवतात. नंतर केतकी काकू खोलीत जाऊन त्या दोघांना ही आनंदाची बातमी देते आणि ही बातमी ऐकताच दोघे आनंदाने नाचू लागतात.
मात्र ही गोष्ट विरोचकापर्यंत पोहोचू नये असं केतकी काकू तन्मयला सांगते. हे सांगत असतानाच रुपाली दारात उभी असते. त्यामुळे तिने ही बातमी ऐकली की काय असं त्यांना वाटतं. पण रुपाली फाल्गुनीच्या पायाला लेप लावायला आलेली असते. यानंतर अद्वैत नेत्राला तिची काळजी घेण्याविषयी सांगतो. डॉक्टरांनी तिला सांगितलेली औषधे कशी घ्यावीत याविषयी तिला सांगतो.