शनिवार, ऑगस्ट 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लीलाबरोबर एजेची आईही घराबाहेर पडणार, घरी येण्यास स्पष्ट नकार, सरोजनिच्या हट्टामुळे दोघंही पुन्हा एकत्र येणार?

Saurabh Moreby Saurabh More
जून 10, 2024 | 6:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla new twist in the serial Sarojini also left the house with Leela.

लीलाबरोबर एजेची आईही घराबाहेर पडणार, घरी येण्यास स्पष्ट नकार, सरोजनिच्या हट्टामुळे दोघंही पुन्हा एकत्र येणार?

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील एजे व लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडतेय. एजे व लीला ही एकमेकांच्या विरोधी स्वभावाची जोडी एकत्र येईल का, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मालिकेत नुकताच एजे व लीला यांच्या लग्नाचा ट्विस्ट पाहायला मिळाला. श्वेताऐवजी एजेचे लग्न हे लीलाबरोबर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. मालिकेतील हा ट्विस्ट मालिकेच्या चाहत्यांना आवडला असला तरी एजेच्या सूनांना ही गोष्ट काही पटलेली नाही. एजेलादेखील श्वेताऐवजी त्याचे लीलाबरोबर लग्न झालेले पटलेले नाही. याबद्दल त्याने लीलावर राग व्यक्त  केला होता. तसेच लीलानेही एजेचा विश्वासघात केल्याचे त्याने म्हटले होते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

यानंतर आता लीलाने जहागीरदारांच्या घरात प्रवेश केला आहे. मात्र ही गोष्ट एजेंच्या सूनांना पटलेली नाही. अशातच आता नुकताच मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या नवीन प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या नवीन प्रोमोमध्ये एजेंची आई सरोजिनी लीलाबरोबर घराबाहेर पडल्या आहेत. घरातल्या कुणालाच काहीच न् सांगता त्या लीलाबरोबर घराबाहेर पडल्या आहेत.

आणखी वाचा – ‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूरने सोडली होती दारू, पण शूट पूर्ण होण्यापूर्वीच नशा करु लागला अभिनेता, पार्टीतील फोटो समोर

त्यामुळे सर्वजण चिंतेत पडले असून एजे आईला फोन करतो तेव्हा एजेची आई असं म्हणते की, “अभिराम जशा तूला तुझ्या सूना महत्त्वाच्या आहेत. तशी माझी सूनही माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मी आता घरी येईन तर माझ्या सूनेला सोबत घेऊनच येईन.” कथानकातील हा नवीन ट्विस्ट सध्या प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. तसेच या प्रोमोला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – आधी तीन वेळा आयव्हीएफ, गंभीर आजार; आता सुप्रसिद्ध अभिनेत्रीची अचानक झाली सर्जरी, कॅमेऱ्सामोरच रुग्णालयात ढसाढसा रडली अन्…

दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओखाली “खूपच छान, खूपच मस्त, आता मज्जा येणार” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे कथानकात पुढे काय होणार? एजे-लीला पुन्हा एकत्र येणार का? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.   

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsNavri Mile Hitlerla
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
 Kuku kohli death
Entertainment

ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन, दोन दिवसांपूर्वी आला हृदयविकाराचा झटका, बॉलिवूडला दिले हिट मुव्ही

ऑगस्ट 26, 2026 | 11:12 am
Next Post
sameera reddy

"स्तनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला अन्…", सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, "माझ्या शरीरामध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.