Saatvya Mulichi Saatvi Mulgi : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. अलीकडेच मालिकेत विरोचकाचा वध करण्यात आला. पण विरोचकाच्या वधाचा बदला घेण्यासाठी शतग्रीव नावाच्या असूराची एण्ट्री झाली आहे. डॉ. मैथिली सेनगुप्तामध्ये शतग्रीव असूराने प्रवेश केला असून हा असूर आता नेत्रापर्यंत पोहोचला आहे. नेत्राच्या घरातही या असूराने प्रवेश केला आहे. शतग्रीवने नेत्रा आणि तिच्या कुटुंबीयांना फसवून त्यांच्या घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे या मालिकेला नवीन वळण आलं आहे. (Saatvya Mulichi Saatvi Mulgi Serial Update)
अशातच आता हा शतग्रीव त्रिनयना देवीची लेक इंद्राणीची हत्या करणार असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नवीन ट्विस्टचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातून इंद्राणीची हत्या होणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या नवीन प्रोमोमध्ये इंद्राणी नेत्रालं फोन करुन असं म्हणते की, विरोचकाचा वध झाला आहे. पण त्यापेक्षाही मोठं संकट आपल्यावर आलं आहे”. तर शतग्रीव असं म्हणतो की, “आता शतग्रीवसमोर दोन आव्हाने आहेत, एक म्हणजे रीमारूपी अकंपणाचा ताबा मिळवणे आणि दूसरं म्हणजे त्रिनयनाची लेक इंद्राणी हिची हत्या करणे” .
आणखी वाचा – Video : प्रथमेश लघाटेने गवळण गाताच भर कार्यक्रमात उठून नाचू लागल्या आजी, ‘ते’ दृश्य पाहून बायकोही भारावली
त्यामुळे आता शतग्रीव इंद्राणीची हत्या करणार की त्रिनयना देवी आपल्या लेकीला शतग्रीव असूरापासून वाचवणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसंच शतग्रीव असूराने नेत्राच्या घरी प्रवेश केला असून तिच्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबीयांनाही काही धोका नाही ना? हेदेखील लवकरच पाहायला मिळणार आहे. विरोचकाचा वध झाल्यानंतर एक साधी सरळ स्वभावाची मैथीली सेनगुप्ता शतग्रीव बनते आणि तिच्या सासूचा खून करत महाराष्ट्रच्या दिशेने निघते आणि तिने आता राजाध्यक्षांच्या घरात प्रवेशही केला आहे. या नवीन ट्विस्टवर काही प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. बंद करा मालिका, डबल रोल दाखवून मालिका वाढवत आहेत” अशा कमेंट्स करत यावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : एजे लीलाच्या प्रेमात, आजारी असताना रात्रभर उशाशी बसला अन्…; नातं फुलणार
त्यामुळे मैथिली सेनगुप्ता आणि नेत्राच्या नशिबात नेमकं काय लिहिलंय? ती नेत्राच्या बाळाला घेऊन जाणार आहे का? शतग्रीवच्या येण्याने पुन्हा राजाध्यक्षांवर काही नवीन संकट येणार का? आणि त्यामुळे आता नेत्रा विरोचकानंतर शतग्रीवचा सामना कसा करणार? हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.