राजकारण आणि चित्रपट या क्षेत्रात सध्या एक नाव चांगलंच चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेते, खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, नथुराम गोडसे इत्यादी महत्वाच्या आणि अजरामर भूमिका साकारत महाराष्ट्राच्या राजकारणात एक आघाडीचं नेतृत्व म्हणून देखील त्यांचं नाव सगळीकडे गाजतंय.(Amol kolhe Amruta Khanvilkar)

कलाकार असो किंवा राजकारणी अफवांच्या जाळ्यातून कोणाचीही सुटका अद्याप झालेली नाही. अशाच अफवांच्या जाळ्यात अडकले आहेत अमोल कोल्हे. या संदर्भात त्यांनी एक पोस्ट करत माहिती दिली आहे. एका वृत्तपत्रात ‘अमृता खानविलकर करणार अमोल कोल्हे यांच्या लग्नाची चक्क घोषणाच करण्यात आली आहे.
सोबतच या बातमीत अमृता खानविलकरच्या प्रेमात अमोल कोल्हे पागल झाले असून पहिल्या बायकोला ते घटस्फोट देणार आहेत आणि अमृता सोबत लग्न केल्या नंतर मी उपमुख्यमंत्री देखील होऊ शकतो कारण अमृता हे नाव किती लकी आहे हे आपण जाणतो असं देखील म्हणण्यात आले आहे.(Amol kolhe Amruta Khanvilkar)

अमोल कोल्हे यांनी या पोस्टच्या कॅप्शन मध्ये काही गमतीशीर मजकूर लिहिला आहे एवढंच काय तर अमृता खानविलकरच्या लोकप्रिय चंद्रा हे गाणं देखील त्यांनी जोडलं आहे पुढे उत्तरादखल त्यांनी लिहिलं आहे ‘हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज १ एप्रिल आहे हे माहित होतं… नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!’अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या या पोस्ट वर अनेक यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत तर इंडस्ट्रीतीलअनेक कलाकारांनी देखील यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे देखील वाचा – “पुन्हा असली कामं करू नकोस रे बाबा!” जेव्हा काम बघून आई नानांना म्हणाल्या…
