मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे गायक रोहित राऊत व गायिका जुईली जोगळेकर. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून ही जोडी घराघरांत पोहोचली. काही वर्षांपूर्वीच रोहित व जुईली यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. २०२२ मध्ये या जोडीचं अगदी थाटामाटात लग्न झालं. लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर दोघांच्या सुखी संसार सुरु असलेलाही पाहायला मिळाला. (Rohit Raut And Juilee Jogalekar)
जुईली व रोहित गायनाचे विविध कार्यक्रम घेत नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. बऱ्याच कार्यक्रमांना दोघेही एकत्र गायनाची मैफिल करताना दिसतात. दोघांनीही त्यांच्या गोड आवाजाने स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. शिवाय दोघेही सोशल मीडियावरुनही अनेकदा एकत्र गाणी गाताना दिसतात. रोहित व जुईली यांची अनोखी केमिस्ट्री कायमच प्रेक्षकांना भावते. दोघेही सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात.
आणखी वाचा – पुस्तकांमध्ये दडली आहे एक पेन्सिल, १० सेकंदामध्ये तुम्ही फोटो पाहून ओळखू शकता का?
अशातच जुईली व रोहित पुन्हा एकदा एकत्र गाणार असल्याची चाहूल त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवरुन लागली आहे. जुईली व रोहित त्यांच्या नव्या गाण्याच्या रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त आहेत. दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन त्यांच्या आगामी गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यानचे खास फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी दिलेल्या हॅशटॅगवरुन हे गाणं होळीसाठी असल्याचं कळतंय. अगदी एन्जॉय करत जुईली व रोहित यांनी हे गाणं रेकॉर्ड केलं असल्याचं दिसतंय.

“मैं मेरा शेहेर है, और मैं यहाँ का जयकांत शिखरे”, असं हटके कॅप्शन देत गाणं गाताना दिलेल्या एका पोजचा फोटो त्याने पोस्ट केला आहे. तर “आज एक मनोरंजक असा ट्रॅक रेकॉर्ड केला”, हॅशटॅग होळी असं हटके कॅप्शन देत जुईलीनेही तिचे गाणे गातानाचे खास फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. आता जुईली व रोहित प्रेक्षकांसाठी कोणतं गाणं आणणार? ते गाणं केव्हा येणार? याबाबतची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. या गाण्याची उत्सुकता जुईली व रोहितच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.