चेहऱ्यावर सतत एक मोठं हसू असणारी अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे, त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी साकारत्मकता जाणवते.अनेक माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे, आणि आज ही त्याच उत्साहाने काम करताना त्या पाहायला मिळतात. रेणुका शहाणे म्हणजे हम आपके है कौन चित्रपटच नाव आपसूकच तोंडी येत.सर्व स्टार कास्ट सोबत मराठी सिनेसृष्टीमधील एक महत्वाची व्यक्ती या चित्रपटात झळकली ती म्हणजे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. त्या चित्रपटाविषयी आपुलकी वाटण्याचे तेही एक महत्वाचे कारण आहे.त्या चित्रपटाने एक आदर्श कुटुंबाच्या, प्रेमाच्या अपेक्षा या चित्रपटामुळे नक्कीच शिगेला पोचवल्या हे मात्र खार आहे. या चित्रपटाचे वैशिट्य म्हणजे नायक, नायिकेला जितकं प्रेम मिळालं, तितकाच प्रेम आणि कौतुक, ओळख या चित्रपटातली इतर कलाकारांनाही मिळाली. (Laxmikant Berde Renuka Shahane)

हम आपके है कौन या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाली होती त्या निमित्ताने रेणुका शहाणे यांची मुलखात घेणयात आली होती.तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या बॉण्डिंग बदल विचारण्यात आले होते,तेव्हा इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखती मध्ये त्या म्हणाला,हाच सुनाबाईचा भाऊ हा रेणुका शहाणे यांचा पहिला चित्रपट होता, आणि त्यात त्या लक्ष्मीकांत यांच्या हिरोईन होत्या.त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील त्यांची सुरवातच लक्ष्मीकांत बेर्डेनसोबत झाली आहे.तेव्हा लक्ष्मीकांत त्यांना म्हणाले, तू माझी हिरोईन, मला वाटत नाही की असं काम तू करू शकशील.
पाहा काय आहे किस्सा ? (Laxmikant Berde Renuka Shahane)
त्या चित्रपटादरम्यान लक्ष्मीकांत बेर्डेनी रेणुका ताईंना खूप शिकवलं असं त्या म्हणतात. हजरजबाबीपणा त्या शिकल्या.त्या नंतर एका सिन दरम्यान रेणुका आणि लक्ष्मीकांत यांना डान्स करायचा होता, तेव्हा त्या म्हणल्या लक्ष्मीकांत खूप उत्तम नृत्य करायचे आणि त्यांना इतकं जमायचं नाही म्हणून त्यांचे नुर्त्य दिग्दर्शक त्यांना खूप ओरडत होते. आणि रेणुकाना सवय नव्हती त्यांना कोणी अशी ओरडायची, म्हणून त्यांना रडू आलं, लॉन्ग शॉर्ट असल्यामुळे इतर कोणाला कळालं नाही की त्या रडत आहेत. तेव्हा लक्ष्या त्यांना म्हणले नाचत राहा लाऊड एक्सप्रेशन्स देत राहा. आणि तो सिन संपल्या नंतर लक्ष्मीकांत यांनी रेणुकांचे अभिनंदन केले. रेणुकानी त्यांना विचारलं इथे मला एवढा ओरडा मिळाला आणि तू माझं अभिनंदन करतो आहेस, तेव्हा ते रेणुकांना म्हणाले सुबल दादा म्हणजे त्यांचे नुर्त्य दिग्दर्शक आजवर ज्या ज्या अभिनेत्रींना ओरडले आहेत, त्या पुढे जाऊन मोठ्या अभिनेत्री झाल्या आहेत. (Laxmikant Berde Renuka Shahane)

लक्ष्मीकांत बेर्डे हे अजबच रसायन होते. अनेक कलाकारांच्या त्यांच्या सोबतच्या अनेक चांगल्या आणि भावनिक आठवणी आहेत त्यांच्या विषयी बोलताना असे म्हणावेसे वाटते, असा नट तर नाहीच पण असा माणूस होणे नाही. दोन उत्साही आणि हसतमुख कलाकार एकत्र येतात तेव्हाच एक उत्तम कलाकृती बनते.