Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai Suicide) यांनी आत्महत्या केल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. ‘एबीपी माझा’च्या वृतानुसार, नितीन देसाई यांनी उभारलेल्या एन. डी. स्टुडिओमध्येच आत्महत्या केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नितीन देसाई एन. डी.स्टुडिओमध्ये होते. एन. डी. स्टुडिओ येथेच त्यांचं छोटंसं घर होतं. दोन दिवसांपासून ते एन. डी. स्टुडिओमध्येच होते, त्यांची कामही सुरूच होती. दरम्यान आज सकाळी त्यांनी कोणाच्याही फोनला उत्तर दिलं नाही वा ते घराबाहेर आले नाहीत. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना कळवलं, घरून ही फोन करण्यात आले. पण नितीन देसाई यांनी कुटुंबीयांना उत्तर दिलं नाही. त्यांनतर कर्मचाऱ्यांनी एन. डी. स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं. तेव्हा नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं. नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. (Art Director Nitin Desai Commits Suicide)
मनसे नेते व दिग्दर्शक अभिजित पानसे ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाले, “मला खरंतर काहीच सुचत नाही आहे. खरं तर ही बातमी ऐकल्यावर मला थरथरायला झालं आहे, गलबललोय मी, गेल्या काही महिन्यांमध्ये माझं आणि नितीन दादांचं बोलणं सुरु होतं, पुण्यात एक फिल्म स्कुल सुरु करायची आहे, आणि त्याच्या प्रॉडक्शन डिझाईन संदर्भात बोलायचं होतं.”
पाहा नितीन देसाई यांच्या निधनानंतर अभिजित पानसेंनी दिली प्रतिक्रिया (Art Director Nitin Desai Commits Suicide)
“माझं जवळजवळ त्यांच्याशी चार वेळा बोलणं झालं, भेटूया असं देखील आमचं ठरलं होतं, मला खरंच काही बोलायला सुचत नाही, खूप मोठं नुकसान झालं आहे. तो नाट्यसृष्टीचा, देशाचा आणि महाराष्ट्राचा असेल पण माझा वैयक्तिक खूप जवळचा माणूस गेला आहे, हे असं दादांनी का केलं ते मला माहित नाही. मला बोलायलाही जमत नाही आहे.”
कला दिग्दर्शक नव्हे तर अभिनय क्षेत्र तसेच बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातही नितीन चंद्रकांत देसाई यांचं नांव अव्वल स्थानावर होते. कला दिग्दर्शक तसेच अभिनय क्षेत्र आणि दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांचा हातखंडा होता. मराठी मनोरंजन सृष्टीला एक वेगळं नाव देण्याचा त्यांनी कायमच प्रयत्न केला.