मनोरंजन सृष्टी गाजवणारे अनेक कलाकार या चित्रपट इंडस्ट्रीत आहेत पण क्रिकेटच मैदान गाजवणारा एक अस्सल नायक म्हणजे महेंद्रसिंग धोनी. भारतीय क्रिकेट इतिहासात सगळ्यात यशस्वी कर्णधारांच्या यादीत धोनीचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. नाव जेवढं मोठं त्याची व्याप्ती तेवढी मोठी असं म्हणतात. धोनीचं काहीस तसाच आहे आज जगभरात त्याचे फॅन्स पाहायला मिळतात. धोनीची वाढती लोकप्रियता पाहून त्याच्या जीवनावर आधारित ‘ MS Dhoni – the told story या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटात स्वर्गीय अभिनेता सुशांत सिंग राजपूत ने धोनीची भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांनी देखील त्या भूमिकेला प्रचंड प्रेम दिलं होत.(Re release of MS Dhoni movie)

IPL या लोकप्रिय खेळात देखील धोनी हे नाव सुद्धा तितकंच लोकप्रिय ठरतंय. धोनीच्या या कामारी बद्दल ‘MS Dhoni – the told story ‘ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपट गृहात रिलीज करण्याची घोषणा केली आहे. त्याबद्दल निर्मत्यांकडून असं सांगण्यात आलं आहे कि “एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा केवळ स्टार स्टुडिओसाठीच नव्हे, तर जगभरातील भारतीयांसाठीही एक खास चित्रपट आहे, जो भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोनीचा प्रेरणादायी जीवनप्रवास दाखवतो.
हे देखील वाचा –‘महेश महेश…लक्ष्या मी आलोच’ महेश कोठारेंचा हा फॉर्मुला न वापरल्यामुळे ‘या’ चित्रपटाला आलं होत अपयश…
चित्रपटाच्या पुनर्र प्रदर्शना मागचा उद्देश देशभरातील धोनीच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर क्रिकेटचे सर्वात जादुई क्षण पुन्हा अनुभवण्याची आणखी एक संधी देणे हा आहे”.येत्या 12 मे रोजी हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू या भाषांमध्ये पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. यापूर्वी ‘एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट 30 सप्टेंबर 2016 रोजी पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता.(Re release of MS Dhoni movie)