कामातून मोकळा वेळ मिळाला, की अनेक गृहिणी टीव्हीवर मालिका बघत असतात. सध्या मालिकाविश्वात
स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा ही मालिका सर्वात जास्त पहिली जाणारी मालिका आहे. मालिकेचे कथानक जसे पुढे जात गेले, तसे मालिकेमध्ये अनेक बदल घडत गेले. (Rang Maza Vegla Troll)

आता मालिकेत सुरु असलेल्या कथानकानुसार कार्तिक दीपकडून बदला घेण्यासाठी काटकारस्तान करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी मालिकेत दीपाला किडन्याप करून घेऊन गेलेला मुन्ना भाई दीपाला टेडीबेअर आणि जोकर बनून घाबरवतो आणि तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतो. तो दीपाला म्हणतो, आधी तू हे जेवण जेवून घे मग तुला मी घरी जाऊ देईल, दीपाच्या मनात नसताना दीपा ते जेवण जेवते. त्यानंतर दीपा बेशुद्ध होते. पुन्हा त्यातील टेडीबेअर तिला घरी सोडवतो.
हे देखील वाचा:अश्विनीने शेअर केली शाहीर साबळेंसोबतची खास आठवण
दीपा घरचांना सांगते कि तिला कोणी तरी किडन्याप करून घेऊन गेलं होत. दीपाच्या मागे पोलीस सुद्धा येतात. पोलीस दीपाची विचारपूस करतात. तेव्हा दीपा सांगते मला जोकर आणि टेडीबियरने किडन्याप केलं होतं. त्यावर पोलिसांना विश्वासच बसत नाही. दीपा आत गेल्यानंतर पोलीस सौंदर्याला म्हणतात मला असं वाटतंय दीपाला पोलिसांची नाही तर डॉक्टरांची गरज आहे. असं म्हणून पोलीस निघून जातात. या नुसार मालिकेत कार्तिक दीपाला वेड ठरवण्यासाठी प्राण पणाने तेवढे प्रयत्न करतोय. (Rang Maza Vegla Troll)
हे देखील वाचा: साईशा झाली मल्हारची नवीन हेअरस्टाईलीश,व्हिडीओ व्हायरल
तर एकीकडे कार्तिक जेल मध्ये गेल्याचा दोष कार्तिकी अजून पर्यंत दिपालाच देत आहे. परंतु नुकताच मालिकेचा प्रमो समोर आला आहे. प्रमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे कार्तिकी दीपासाठी पोहे बनवताना दिसत आहे.
हा प्रमो स्टार प्रवाह वाहिनीच्या ऑफिशल पेजने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा प्रमो पाहून “हिने जर कांदे पोहे आर्यन साठी केले असतील तर हिचे लग्न जमणे जरा अवघडच आहे. तिला आईच्या मदतीची नक्कीच गरज आहे.” तसेच मुली अगदी २० च्या दिसत आहे पण आई बाकी अजून २५ वर्षांचीच आहे” अशा ट्रॉल करणाऱ्या कंमेंट्स केल्या आहेत.