बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘रामायण’ या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून अभिनेता चित्रीकरणामध्ये खूपच व्यस्त आहे. अभिनेता त्याच्या भूमिकेसाठी खूपच मेहनत घेत आहे. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी त्याने दारू व मांसाहार सोडल्याचे सांगितले होते. अशातच आता रणबीरचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या हातात दारूचा ग्लास दिसत आहे.
नुकताच राधिका मर्चंट व अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगची भव्य पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये रणबीरनेही सहभाग घेतला होता आणि याच पार्टीतला त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रणबीरने हातात एक ग्लास धरला आहे. ज्यामध्ये दारु असल्याचे भासत आहे.
Ranbir kapoor ,ayaan mukherji shanaya kapoor
— raj (@rajkbest) June 3, 2024
and SRK daughter suhana khan #ranbirkapoor pic.twitter.com/RY1FtFsvYS
या फोटोमध्ये रणबीर कपूरने पांढऱ्या रंगाचे जॅकेट आणि ट्राउझर्स परिधान केले असल्याचे दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये अभिनेता अंबानींच्या पार्टीत पाहुण्यांशी बोलताना दिसत आहे. तसेच तो शनाया कपूरच्या शेजारी उभा असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.
या फोटोमध्ये रणबीरच्या हातात असलेला ग्लास हा नक्की दारुचा आहे?, की त्यात आणखी काही वेगळे पेय आहे? याबद्दल काही माहिती समोर आलेली नाही. मात्र रणबीरच्या या फोटोने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे तो टीकेचा धनी झाला आहे.
रणबीरच्या हातातील पेय हे दारु असल्याचे समजून अनेकजण त्याच्यावर नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, ‘अॅनिमल’ या लोकप्रिय चित्रपटानंतर अभिनेता त्याच्या आगामी ‘रामायण’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.