शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रामानंद सागर यांच्या लेकाचे निधन, वर्षभरापूर्वीच दुसऱ्या मुलाचे झालेले निधन, सागर कुटुंबावर शोककळा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 14, 2026 | 3:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ramanand sagar son anand death

रामानंद सागर यांच्या लेकाचे निधन, वर्षभरापूर्वीच दुसऱ्या मुलाचे झालेले निधन, सागर कुटुंबावर शोककळा

ramanand sagar son anand death : रामानंद सागर यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ‘रामायण’सारखी हिट टीव्ही मालिका करणारे रामानंद सागर यांचा मुलगा आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पवन हंस स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. आनंदच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर आनंदच्या मृत्यूची माहिती दिली. आनंद रामानंद सागर चोप्रा यांच्या निधनाने सागर कुटुंबाचे एक प्रभावी शतक संपुष्टात आले आहे.

रामानंद सागर यांच्या कुटुंबीयांनी आनंद सागर यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आणि शोक व्यक्त केला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही आमचे प्रिय वडील आनंद रामानंद सागर चोप्रा यांच्या निधनाबद्दल अत्यंत दु:खाने आणि अत्यंत खेदाने कळवत आहोत. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:३० वाजता पवन हंस हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत”.

आणखी वाचा – आई सोडून गेली, नवऱ्याने १० लाख उडवले आणि…; अखेर राखीच्या अश्रूंचा बांध फुटला, एकटेपणाबाबत म्हणाली…

आनंद रामानंद सागर यांनी त्यांचे वडील रामानंद सागर यांच्याप्रमाणे टीव्हीच्या दुनियेत अभूतपूर्व काम सुरु ठेवले. त्यांनी २००८ मध्ये ‘रामायण’ हा टीव्ही शो बनवला, ज्यामध्ये गुरमीत चौधरीने श्री राम आणि देबिना बॅनर्जीने आई सीतेची भूमिका केली होती. या मालिकेतील ‘राम आणि सीता’च्या भूमिकेतून गुरमीत आणि देबिना घराघरात प्रसिद्ध झाले. रामानंद सागरचे आणखी अनेक उत्कृष्ट प्रकल्प त्यांनी नव्या पद्धतीने प्रसारित केले. आनंदने वडील रामानंद सागर यांचा वारसा जतन करुन पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आणखी वाचा – “भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही”, रितेश देशमुख रुचितावर भडकला, म्हणाला, “कुठल्याच आईला…”

आनंद रामानंद सागर चोप्रा यांनी त्यांच्या वडिलांच्या ‘सागर आर्ट्स’ या प्रॉडक्शन हाऊसमधील क्रिएटिव्ह, प्रोडक्शन आणि नवीन प्रोजेक्ट्सचे मॅनेजमेंट हे कामही उत्तम प्रकारे हाताळले. आता त्यांच्या निधनाने संपूर्ण सागर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ऑगस्ट २०२५ मध्येच आनंद सागर यांचा भाऊ आणि रामानंद सागर यांचा दुसरा मुलगा प्रेम सागर यांचे निधन झाले होते. त्याने ‘विक्रम और बेताल’सारखे हिट शो तयार केले होते. त्यांनी इतर अनेक पौराणिक मालिकाही केल्या.

Tags: anand sagar deathentertainemnt newsRamanand sagar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

ankita lokhande vicky jain abu dhabi vacation
Entertainment

हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मराठी असूनही…”

मे 29, 2026 | 10:20 am
The Maharashtra Files Marathi Movie
Entertainment

‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे तांत्रिक अडचणी आणि सेन्सॉर बोर्डाच्या बदलांमुळे प्रदर्शन पुढे, नवीन तारीख लवकरच होईल जाहीर

मे 29, 2026 | 12:00 pm
shashank shende role in ghabadkund
Entertainment

शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, ‘घबाडकुंड’ चित्रपटातील लूकची चर्चा

मे 28, 2026 | 10:01 am
veteran actor ramakant dayama death
Entertainment

‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्याचे निधन, वयाच्या ६५व्या वर्षी निधन, सहकलाकाराची भावुक पोस्ट

मे 26, 2026 | 2:16 pm
Next Post
Mulund Metro Accident

मोठी बातमी! मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅप कोसळला आणि…, एकाचा मृत्यू…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.