शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई सोडून गेली, नवऱ्याने १० लाख उडवले आणि…; अखेर राखीच्या अश्रूंचा बांध फुटला, एकटेपणाबाबत म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 14, 2026 | 10:15 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
rakhi sawant emotional

आई सोडून गेली, नवऱ्याने १० लाख उडवले आणि…; अखेर राखीच्या अश्रूंचा बांध फुटला, एकटेपणाबाबत म्हणाली…

rakhi sawant emotional : एंटरटेनमेंटची क्वीन राखी सावंतने आजवर अनेकांना हसवलं. सगळ्यांचं मनोरंजन केलं. अनेकांना तिचा मिश्किल अंदाज आवडतो तर काहीजण तिच्यावर टीकाही करतात. या सगळ्यातूनही राखी कायम स्ट्रॉंग दिसली. मात्र या स्ट्रॉंग राहण्यामागे अनेक गुपित लपली आहेत. या स्ट्रॉंग चेहऱ्यामागे अनेक दुःख आहेत. एकटेपणा आहे. आणि याबाबत राखी कधीच बोलली नाही. पण ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ मध्ये राखी तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर एकटी असल्याचं म्हणत भावुक झालेली दिसली. आई-वडिलांचं जाणं, नवऱ्यापासून घटस्फोट या सगळ्याचा तिच्याही मनावर परिणाम झाला आहे असेही तिने यावेळी म्हटलं. पण तिची ही बाजू तिने कधीच कोणाला ऐकवली नाही.

‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंत तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद यांच्यासमोर भावुक झालेली दिसली. राखी सावंत म्हणाली, “मला माझी इमोशनल बाजू सर्वांसमोर दाखवायला अजिबात आवडत नाही. मला सगळ्यांकडून असं प्रेम मिळण्याची सवय राहिलेली नाही. मला शिव्या द्या… मला काहीही बोला पण, प्रेम नको. आता साडेतीन वर्षे झाली आई-बाबा मला सोडून गेले, घटस्फोट झाला. एवढं सगळं होऊन आयुष्यात मी कधीही हरले नाही. मी बिग बॉसमध्ये असताना आईचं निधन झालं होतं”.

आणखी वाचा – थलपती विजयच्या रॅलीत महाराष्ट्रातील तरुणाचा मृत्यू, पत्रकार-कार्यकर्त्यांमध्ये वाद, नेमकं प्रकरण काय?

पुढे ती म्हणाली, “मी शोमध्ये येण्यापूर्वी आईसाठी नवऱ्याला १० लाखांचा चेक दिला होता की, काहीही झालं तरी आईला काही होऊ देऊ नकोस. तिला रुग्णालयात दाखल कर आणि पैसे भर हा निरोप मी त्याला देऊन शोमध्ये आले होते. माझ्या घरात फक्त मी कमवत होते. मी त्याला बोलले होते की, तुझ्यावर विश्वास आहे. तू नवरा आहेस. मी जाते बिग बॉसमध्ये… नवऱ्याने तेव्हा मला सांगितलं होतं, ‘तू जा…तुझी आई तिच माझी आई मी तिचं सगळं करणार’ पण, जेव्हा मी शोमधून बाहेर आले तेव्हा आई नव्हती”.

आणखी वाचा – “भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही”, रितेश देशमुख रुचितावर भडकला, म्हणाला, “कुठल्याच आईला…”

शेवटी पाणावलेल्या डोळ्यांनी राखी म्हणाली, “शोमध्ये फिनाले झाला आणि मी तेव्हा आईसाठी रुग्णालयात होते. माझी आई गेली… त्या नवऱ्याने मी दिलेले सगळे १० लाख रुपये उडवले. तेव्हा, मी शोमध्ये होते. मला काहीच माहिती नव्हतं. तू माझं सगळं घे… पण, माझ्या आईला वाचवायला हवं होतं. आई कोमात गेली होती. मी तेव्हापासून साडेतीन वर्षे एकटी आहे”.

Tags: Bigg Boss Marathi 6entertainmentrakhi sawant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

ankita lokhande vicky jain abu dhabi vacation
Entertainment

हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मराठी असूनही…”

मे 29, 2026 | 10:20 am
The Maharashtra Files Marathi Movie
Entertainment

‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे तांत्रिक अडचणी आणि सेन्सॉर बोर्डाच्या बदलांमुळे प्रदर्शन पुढे, नवीन तारीख लवकरच होईल जाहीर

मे 29, 2026 | 12:00 pm
shashank shende role in ghabadkund
Entertainment

शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, ‘घबाडकुंड’ चित्रपटातील लूकची चर्चा

मे 28, 2026 | 10:01 am
veteran actor ramakant dayama death
Entertainment

‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्याचे निधन, वयाच्या ६५व्या वर्षी निधन, सहकलाकाराची भावुक पोस्ट

मे 26, 2026 | 2:16 pm
Next Post
ramanand sagar son anand death

रामानंद सागर यांच्या लेकाचे निधन, वर्षभरापूर्वीच दुसऱ्या मुलाचे झालेले निधन, सागर कुटुंबावर शोककळा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.