बॉलिवूडमध्ये काही दिवसांपासून राखी सावंत कमालीची चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानी प्रकरणामुळे राखीची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. दररोज ती आपल्या पती विरोधात काही ना काही नवीननवीन शोधून मीडियासमोर त्याचे खुलासे करताना दिसतेय. (rakhi sawant new inning)
राखीने पतीविरोधात तक्रार केल्यानंतर त्याला म्हणजेच आदिल खानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता राखीने या सगळ्यातून काढता पाय घेत स्वतःला वेगळ्या दिशेला वळविले आहे. पतीच्या प्रकरणातून बाहेर येत तिने स्वतःचे लक्ष पुन्हा एकदा करिअरकडे वळविले आहे. याबाबतची माहिती तिने नुकतीच शेअर केली आहे. (rakhi sawant new inning)

राखी सावंत नुकतीच दुबईला रवाना झाली आहे. या दरम्यानचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात ती मुंबई विमानतळावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान तिने व्हिडिओद्वारे तिच्या नव्या इनिंग ची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या दरम्यान बोलताना तिने दुबईत स्वतःची ऍक्टिंग अॅकॅडमी सुरू करत असल्याचे सांगितले आहे.
====
हे देखील वाचा – ‘राज ठाकरेंनी मला त्यासाठीच बोलावलं होत’ – शिव ठाकरे
====
याच अॅकॅडमीच्या उद्घाटनासाठी राखी दुबईला रवाना झाली आहे. या तिच्या नवीन अॅक्टिंग अॅकॅडमीचे नाव ‘राखी सावंत अकॅडमी’ असे ठेवण्यात आले आहे. राखीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यात ती म्हणाली, “मी आता विमानतळावर आहे आणि दुबईला जाण्यासाठी सज्ज आहे. तुम्ही उत्सुक आहात ना? माझी अॅकॅडमी सुरू होत आहे. राखी सावंत अकॅडमी. लवकरात लवकर या अॅकॅडमीत प्रवेश घ्या. मीही बघते दुबईतून या अॅकॅडमीत प्रवेश घ्यायला कोण कोण येतंय.”(rakhi sawant new inning)
पहा राखीची नवी इनिंग – (rakhi sawant new inning)
आता तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहीजण नवीन अॅकॅडमी सुरू केल्याबद्दल तीच कमेंटद्वारे कौतुक करत आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हिच्याकडून अभिनय शिकण्यापेक्षा मी हे क्षेत्रच निवडणार नाही.” तर दुसरा नेटकरी म्हणाला आहे की, “तुला भेटायला दुबईत कोण येणार! तू काय नोरा फतेही आहेस?” तर या सोबतच अनेकांनी तिला तिच्या या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.(rakhi sawant new inning)
राखी वेगवगेळ्या कारणामुळे कायमच चर्चेत असते, आता तिची ही नवी इनिंग कितपत चर्चेचा विषय ठरणार हे पाहणं औत्स्युक्याचे ठरणार आहे.