रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चित्रपटांसाठी कर्ज काढणं राजपाल यादवला महागात, कर्ज न फेडल्यामुळे बँकेने सील केली कोटींची संपत्ती, घरंही गेलं अन्…

सौरभ जाधवby सौरभ जाधव
ऑगस्ट 13, 2024 | 3:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rajpal Yadav Property

चित्रपटाच्या निर्मितीसाठी राजपाल यादवने बँकेकडून कर्ज घेतले होते परंतु वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेकडून ही कारवाई करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे.

सामान्य माणूस असो वा एखादा हिंदी कलाकार कायदा व सुव्यस्थेच्या घटनांमधून कोणालाही सुटका मिळाली नाही. अशाच एका अडचणीत सापडला आहे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव. आपल्या हटके विनोद शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता राजपाल यादव आता अभिनया व्यतिरिक्त एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. अभिनेता राजपाल यादवची कोटयावधी रुपयांची संपत्ती बँकेकडून जप्त करण्यात आली आहे. एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी राजपाल यादवने बँकेकडून कर्ज घेतले होते परंतु वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेकडून ही कारवाई करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे. (Rajpal Yadav Property)

२०१२ साली ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी राजपालने सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून तब्बल ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची काहीही रक्कम परत न केल्याने संपूर्ण कर्ज आता ११ कोटींच्या घरात पोहचले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या कर्जासाठी राजपालने वडिलांच्या नावावर असलेली घर व जमीन बँकेकडे गहाण ठेवली होती. बँकेकडून आता त्याच घरावर व जमिनीवर जप्ती आणल्याचं समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक बँकेच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली असून रातोरात बँकेकडून “सदर मालमत्ता बँक ऑफ इंडियाची असून त्यावर कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री करू नये” अशा प्रकारचा बोर्ड लावण्यात आला आहे.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi च्या घरात मालवणी भाषेचा अपमान?, ही मराठी भाषा नसल्याचं निक्कीकडून जाहीर, अंकिताला डिवचलं

राजपाल यादववर या आधी ही अशाच प्रकारची एक कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही एका चित्रपटासाठी राजपाल यादवने एका बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परत फेड न करता आल्यामुळे राजपालला ३ महिन्यासाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. दिल्लीयेथील ‘मुरली प्रोजेक्ट्स’ या कंपनीकडून राजपाल यादवच्या ‘श्री नौरंग गोदावरी एंटरटेनमेंट’ या कंपनीविरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता. (Rajpal Yadav Property)

आणखी वाचा- Bigg Boss Marathi : डीपी व इरीनाचं भांडण, पण उगाचच मध्ये आला वैभव, आरडाओरड आरोप करत वाद वाढवला अन्…; प्रेक्षकही संतापले

राजपाल यादवने हिंदी मनोरंजन सृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. राजपलच्या हटके विनोदशैली ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘खट्टा मिठा’, ‘भूल भुल्लया’,’ढोल’,’दे दना दन’ अशा अनेक चित्रपटांमध्ये धमाल भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
krushna abhishek do jackie shroff mimicry

फक्त 'या' एकाच अभिनेत्याला जॅकी श्रॉफ यांची अधिकृतरित्या नक्कल करण्याची परवानगी, म्हणाला, "त्यांनी मला फोन करत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.