Raj Thackeray On Marathi Cinema : महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे नेते, त्यांच्या सुख-दुःखात, त्यांच्यासाठीच्या हक्काच्या लढ्यात नेहमीच सज्ज असणारे नेते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. नुकतीच राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्युब चॅनेलला भेट दिली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मराठी सिनेमांची सद्य परिस्थिती, मराठी सिनेमांना सिनेमागृह मिळणं याबाबत थेट भाष्य केलं आहे. महेश मांजरेकर आणि राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट याशिवाय राजकारणातील अनेक मुद्द्यावर खुलेपणाने भाष्य केलं. सध्या त्यांची ही मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आणि यावेळी राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट चालत नाही याला मराठी सिनेसृष्टीच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
महेश मांजरेकर यांनी, “सिनेमा मराठी माणसांनी आणला, काही मराठी माणसांनी सिनेमा मोठा केला, व्ही.शांताराम त्यावेळी मराठी, हिंदीमध्ये चित्रपट बनवायचे पण आज मराठी चित्रपटांची परिस्थिती अशी आहे की, काही वर्षांनी मराठी चित्रपट व्हायचे अशी बोलायची वेळ येईल”, अशी खंत महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात हिंदी भाषा इतकी बोलली जाते तितकी इतर कुठेही बोलली जात नसावी, महाराष्ट्रात खरी हिंदी बोलली जाते, यासाठी काय करता येईल?”, असा सवाल मांजरेकरांनी राज ठाकरे यांना केला.
माणसे अध्यक्ष राज ठाकरे यावर उत्तर देत म्हणाले, “मुळात मराठी माणसाने तुमचे चित्रपट पाहायला का यावं? मराठी चित्रपट प्रेक्षकांना वेगळं काय देतं?. आता ओटीटी प्लॅटफॉर्म आले आहेत. आता ज्याप्रकारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि हिंदीत वेगळे चित्रपट येत आहेत. मराठी चित्रपटाच्या कथानकांनी आजूबाजूचे वातावरण पाहून कात टाकणं आवश्यक आहे”. बरेच दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी सिनेमांना चित्रपटगृह मिळत नाही हा वाद सुरु आहे, यावर अखेर राज यांनी प्रतिक्रिया देत खडेबोल सुनावले आहेत.
आणखी वाचा – दुपारी झोपावं की नाही?, तुम्हालाही ही सवय असेल तर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर
राज ठाकरे म्हणाले, “मराठी चित्रपटांना सिनेमागृह मिळत नव्हतं हा विषय आला तेव्हा मी आंदोलन केलं आणि सिनेमागृह मिळवून दिले. तेव्हा मी एक बैठक घेतली होती. म्हणालो होतो की, मराठी चित्रपटांसाठी मी सिनेमागृह मिळवून देऊ शकतो, पण प्रेक्षक मिळवून देऊ शकत नाही. प्रेक्षक तुम्हाला आणावे लागतील. मराठी चित्रपटाला प्रेक्षक जात नाही असं तुम्ही अजिबात म्हणू शकत नाही. मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे तो चित्रपट पाहायला नक्की जाणार. मध्यंतरी आलेला ‘बाई पण भारी देवा, चित्रपट जोरात चालला, टेलिव्हिजन सोडून वेगळ्या प्रकारचे काही दाखवणार असाल तर प्रेक्षक नक्कीच चित्रपट पाहायला येतील”.