बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आता त्याच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याच्या तुरुंगवासावर आधारित ‘UT 69’ चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. ज्यामध्ये तो स्वतःची भूमिका करताना दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान त्याने एक वक्तव्य केलं आहे, त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (Raj Kundra controversial statement at UT 69 Trailer launch)
सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मुंबईत चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी राजने त्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच त्याच्या डोक्यावरील मास्क उतरवला. आणि माध्यमांच्या प्रश्नांना सविस्तरपणे बोलला आहे. दरम्यान, त्याने याच कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे. “आपल्या देशात या दोनच गोष्टी चालतात, ते म्हणजे शाहरुख खान आणि सेक्स!”, असं वादग्रस्त विधान राजने केलं आहे. त्याच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला जोरदार ट्रोल केलं आहे.
हे देखील वाचा – पोलिसांसमोर कपडे काढले, झोपायलाही मिळेना अन्…; राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणावरील ‘UT 69’चा ट्रेलर प्रदर्शित
राज कुंद्रा याला एका वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी जुलै २०२१ मध्ये अटक झाली. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर जामीन मंजूर झाला होता. त्याच्या तुरुंगवासातील घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. खुद्द राज कुंद्रा यात त्याचीच भूमिका साकारणार आहे, हे विशेष. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला, जो सध्या व्हायरल होत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शहनवाज अली यांनी केलं असून येत्या ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.