राष्ट्रीय पुरस्कार विजेता शास्त्रीय संगीतकार गायक राहुल देशपांडे हे नेहमीच चर्चेत असतात. यासोबत त्यांची मुलगी रेणुका ही देखील सोशल मीडियावर तिच्या धम्माल व्हिडिओने धुमाकूळ घालते.रेणुका लहान असल्यापासूनच राहुल तिचे अनेक व्हिडीओ शेअर करतात. त्यामुळे रेणुका ही चाहत्यांची फेव्हरेट स्टारस्कीट आहे. तिच्या प्रत्येक व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळते.तर आता बऱ्याच दिवसांनी राहुलने तिचा एक व्हिडीओ शेअर केला.(Rahul Deshpande)

रेणुकाचा नुकताच वाढदिवस होऊन गेला,या निमित्ताने राहुलने तिचा हा खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडिओत ही लहानशी रेणुका ही आनंदी,दुःख त्यासोबतच ओंजरने असे वेगवेगळे एक्स्प्रेशन देताना दिसते.भावना,संकल्पना आणि चित्रीकरण-राहुल देशपांडे आमचे बाळ मोठे होत आहे.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझे प्रेम असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला.तर तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला असून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्यात.यासोबतच तिचे एक्सप्रेसशन पाहून चाहते देखील थक्क झालेत.(Rahul Deshpande)
गायक राहुल देशपांडे हे तर लोकप्रिय आहेतच, पण सध्या त्यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय आहे त्यांची लाडकी लेक रेणुका आहे.रेणुकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.या व्हिडिओमध्ये ती गाणी गाताना दिसते, तर कधी अवखळ अभिनय करताना दिसते.रेणुकाचा निरागस स्वभाव नेटकऱ्यांना भावला असून तिच्या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव सतत होत असतो.रेणुकाचा जाहिरातीचा व्हिडिओसुद्धा खूप गाजला. अनेवेळा राहुल देशपांडे यांच्यासोबत ती फेसबुक लाईव्हमध्ये मस्ती करताना दिसते. तिचा हा क्युट अंदाज नेटकऱ्यांना आवडतो. तर राहुल हे गायनासोबत त्यांच्या अभीनयाने देखील चाहत्यांचे मन जिंकतात. त्यांनी मी वसंतराव या चित्रपटात स्वतः पंडित वसंतराव यांची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात त्यांची संगीताची मैफिल देखील पाहायला मिळते.
