शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आता स्वर्गात जाऊन श्रीदेवीला अटक करणार का?”, अल्लू अर्जुनच्या कारवाईवर सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं भाष्य, म्हणाले, “प्रत्येक कलाकाराने…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 20, 2024 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pushpa 2 premiere stampede case Allu Arjun's arrest director and producer Ram Gopal Varma said police will go to heaven to arrest Sridevi

राम गोपाल वर्मांची अल्लू अर्जुनच्या अटकेची श्रीदेवीच्या चित्रपटाशी तुलना, म्हणाले, “स्वर्गात जाऊन तिला अटक करणार का?”

०४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरला झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिला रेवती यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा श्री तेजा गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तो आपल्या जीवनाशी झुंज देत आहे. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटकदेखील झाली. पण अवघ्या काही तासांत त्याची जामिनावर सुटका झाली. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर मनोरंजन सृष्टीतून अनेक संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. अशातच आता दिग्दर्शक व निर्माते राम गोपाल वर्मा यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. (Ram Gopal Varma on Allu Arjun’s arrest)

राम गोपाल यांनी सर्व कलाकारांना अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध करण्याचे आवाहनदेखील केले अआहे आणि या दुःखद घटनेची तुलना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या ‘क्षन क्षनम’ चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या घटनेशी केली आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले आहे की, “प्रत्येक कलाकाराने अल्लू अर्जुनच्या अटकेचा तीव्र निषेध केला पाहिजे. कारण कोणत्याही सेलिब्रिटीसाठी, मग तो चित्रपट स्टार असो किंवा राजकीय स्टार, त्यांच्यासाठी इतके प्रसिद्ध होणे हा गुन्हा आहे का?”

Every STAR should STRONGLY protest against @alluarjun ‘s ARREST because for any celebrity whether it’s a FILM STAR or a POLITICAL STAR , is it a crime for them to be ENORMOUSLY POPULAR???

3 people died in the lakhs of crowd who came to see SRIDEVI in the shooting of my film…

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 19, 2024

यापुढे ते असं म्हणाले की, “माझ्या ‘क्षण शनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवीला पाहायला आलेल्या लाखोंच्या गर्दीत तीन जणांचा मृत्यू झाला. तर आता तेलंगणा पोलीस श्रीदेवीला अटक करण्यासाठी स्वर्गात जाणार का?” त्यामुळे आता अल्लू अर्जुनच्या कायदेशीर कारवाईमागील तर्कावर त्यांनी टीका केली.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada मालिकेत सुरु होणार नवा अध्याय, अक्षरा देणार गरोदरपणाची खुशखबर, प्रोमो व्हायरल

१३ डिसेंबरला ‘पुष्पा’ अभिनेत्याला अटक झाली आणि चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये रात्र काढावी लागली. न्यायालयाने सुरुवातीला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असले तरी नंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.

आणखी वाचा – उस्ताद झाकीर हुसैन अनंतात विलीन, परदेशात पार पडले अंत्यसंस्कार, कुटुंबियांनी जड अंत:करणाने दिला निरोप

दरम्यान, दिवंगत महिला चाहतीचा मुलगा सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचेही अलीकडील अहवालातून स्पष्ट झाले आहे. अभिनेत्याने मृताच्या कुटुंबाला २५ लाख रुपये देण्याचे वचन दिले आहे, नुकतीच त्याचे वडील अल्लू अरविंद यांनी रुग्णालयात जखमी मुलाची भेट घेतली. मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची पुष्टी अरविंद यांनी दिली आहे.

Tags: allu arjun arrested in stampede caseRam Gopal Varma on Allu Arjun's arrestRam Gopal Varma on Pushpa 2 premiere stampede case Allu Arjun's arrest
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
shahrukh khan emotional video

‘स्वदेश’मधल्या ‘त्या’ गाण्यावर शाहरुख खानच्या लेकाचा डान्स, अबरामचा परफॉरमन्स पाहून अभिनेता भावुक, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.