दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या चांगलाच चर्चेत आहे. हैद्राबादच्या संध्या चित्रपटगृहात त्याच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमिअर शोदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. या अटकेमुळे अल्लू अर्जुनला रात्री तुरुंगात घालावी लागली आहे. त्यानंतर आता त्याची सुटका झाली असून तो तुरुंगातून बाहेर आला आहे. अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केल्यानंतर सगळीकडे त्याचीच चर्चा चालू होती. त्याला आता तुरुंगाताच राहावे लागणार का? असे विचारले जात होते. त्याचे चाहतेही चांगलेच नाराज झाले होते. (Allu Arjun released)
मात्र त्याला एक रात्र तुरुंगात काढावी लागली आहे. त्यानंतर आज त्याची सुटका झाली आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्याचे वडील आणि सासरे दोघेही त्याला घेण्यासाठी हैदराबादच्या चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये पोहोचले. वृत्तानुसार, तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की अल्लू तुरुंगाच्या कॅम्पसमधून मागील गेटमधून त्याचे वडील अरविंद आणि सासरे कंचर्ला चंद्रशेखर रेड्डी यांच्यासोबत बाहेर पडले, जे त्याला घेण्यासाठी आले होते.
#WATCH | Hyderabad, Telangana: Actor Allu Arjun says, "I thank everyone for the love and support. I want to thank all my fans. There is nothing to worry about. I am fine. I am a law-abiding citizen and will cooperate. I would like to once again express my condolences to the… https://t.co/wQaQsdicpu pic.twitter.com/nNE1xQTyo5
— ANI (@ANI) December 14, 2024
सायंकाळी उशिरा उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर अल्लू अर्जुन अखेर तुरुंगातून बाहेर आला आहे. अभिनेत्याचे वकील अशोक रेड्डी यांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या सुटकेच्या विलंबावर हैदराबाद तुरुंग प्रशासनावर टीका केली. उच्च न्यायालयाकडून आदेशाची प्रत मिळाल्यानंतरही अभिनेत्याला सोडण्यात आले नाही, याचे उत्तर त्याला द्यावे लागेल, असे तो म्हणतो. ही बेकायदेशीर अटक आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करु.
तुरुंगातून बाहेर येताच त्याने माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्याने असं म्हटलं की, “मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. कायद्याचा मी सन्मान करतो. मी यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. त्या दुर्घटनेत ज्या महिलेचा मृत्यू झाला, त्या महिलेबाबत मी दु:ख व्यक्त करतो. मी त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. ती दुर्घटना फार दुर्दैवी होती. आम्ही चित्रपट पाहायला गेलो होतो. घडलेली दुर्घटना ही मुद्दामहून घडवून आणलेली नव्हती. त्यामागे कोणताही हेतू नव्हता. घडलेल्या दुर्घटनेबाबत आम्हाला दु:ख आहे. आम्ही त्याबाबत क्षमा मागतो”.
दरम्यान, तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांचा अटकपूर्व जामीन दिला आहे. न्यायालयाने अभिनेत्याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तपासात पूर्ण सहकार्य करण्याच्या अटीसह अटकपूर्व जामीन मंजूर केला.