गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची शेवटची पोस्ट व्हायरल, ते पाहून चाहत्यांच्याही डोळ्यात पाणी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 16, 2024 | 12:41 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Zakir Hussain Last Post

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची शेवटची पोस्ट व्हायरल, ते पाहून चाहत्यांच्याही डोळ्यात पाणी

Zakir Hussain Last Post : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी १६ डिसेंबरला सकाळी सॅन फ्रान्सिस्को येथे अखेरचा श्वास घेतला. त्याच्या कुटुंबीयांनी या दुःखद बातमीला दुजोरा दिला. ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते आणि गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल होते. आता झाकीर हुसैन यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी एका अद्भुत क्षणाचा उल्लेख केला आहे. झाकीर हुसैन यांनी २९ ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ परदेशातील आहे. ते फिरायला गेले होते. त्यांनी शेरा केलेल्या व्हिडीओमध्ये वातावरण खूप आल्हाददायक झालेलं दिसत आहे. वारेही वाहू लागल्याने झाडांवर लाल पिवळी पाने फडफडताना दिसत आहेत. त्यांनी हा क्षण शेअर करत ‘सुंदर आणि अद्भुत’ असं म्हटलं.

पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला. या वर्षी त्यांनी तीन ग्रॅमी पुरस्कारही जिंकले होते. झाकीर यांचे इंस्टाग्रामवर २९७K फॉलोअर्स आहेत. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय होते आणि ते त्यांच्या कामाशी व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्ट शेअर करत असत. त्यांनी आपल्या मुली आणि पत्नीसह अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.

आणखी वाचा – शोभिता धुलिपालाचा नागा चैतन्यच्या पायाला स्पर्श करत नमस्कार, अभिनेत्रीची कृती पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “नाटक…”

View this post on Instagram

A post shared by Zakir Hussain (@zakirhq9)

त्यांनी त्यांची मॅनेजर अँटोनिया मिनेकोलाशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत. त्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले. शशी कपूर यांच्याबरोबरही काम केले, पण त्यांनी संगीतावर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. झाकीर हुसेन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठं आहे. झाकीर हुसैन यांच्या असामान्य प्रतिभेमुळे त्यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

आणखी वाचा – तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनने जखमी मुलाची भेट न घेतल्याने नेटकऱ्यांकडून ट्रोल, अभिनेता म्हणाला, “कायदेशीर कारवाईमुळे…”

झाकीर यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. लेखक व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने सूर पोरके होतात ऐकलं होतं, आज पहिल्यांदाच ताल अनाथ झाला असं वाटलं” असं म्हणत आपलं दुःख व्यक्त केलं आहे. तसंच गायिका वैशाली माडेने एका युगाचा अंत झाला असं म्हणत आपली भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसंच रवी जाधव यांनीही भावुक पोस्ट शेअर केली आहे. “एक उस्ताद ज्याने तालाला आत्मा दिला आणि प्रत्येक थाप अविस्मरणीय बनवली. त्यांची कलात्मकता जवळून अनुभवण्याचे भाग्य मला लाभले. तो क्षण मी कायम जपेन. जगाने एक रत्न गमावले आहे, परंतु त्याचा वारसा पिढ्यानपिढ्या प्रतिध्वनीत होईल. उस्तादजी, तुमची खूप आठवण येईल”.

Tags: zakir hussainZakir Hussain Last Postzakir hussain passed away
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame actress Yogita Chavan shared a special video to wish her husband actor Saorabh Choughule on his birthday.

Video : योगिता चव्हाणने नवऱ्याला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, व्हिडीओमध्ये दिसली सौरभ चौघुलेची मजेशीर बाजू

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.