अभिनय क्षेत्रात शून्यापासून सुरुवात करणार एक नाव जे प्रत्येकाच्या मुखावर येत ते म्हणजे अभिनेता, दिगदर्शक प्रवीण तरडे. मुळशी पॅटर्न, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव या मोठ्या चित्रपटांचं दिगदर्शन केल्यानंतर प्रवीण तरडे यांचा अभिनय असलेला ‘बलोच’ हा बहुचर्चित चित्रपट ५ मे २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या तारखेची घोषना झाली असून प्रवीण तरडे यांनी याची पोस्ट शेअर करत या बद्दल माहिती दिली आहे.(pravin tarde’s baloch)
हे देखील वाचा – शिरोडकर, प्राजक्ता तर आता मीराच्या भूमिकेतून केतकीच रुपेरी पडद्यावर पुन्हा आगमन…
प्रवीण तरडे यांनी शेअर केलेल्या पोस्टर मध्ये तरडे यांचा लुक अतिशय रौद्र स्वरूपाचा दिसत आहे. डोळ्यात अंगार, चेहऱ्यावर करारीपणा दिसणारा हा लुक पाहून चित्रपट पाहण्याचा मोह प्रत्येकालाच होईल. इतिहासात नोंद असलेल्या पानिपतच्या लढाई नंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत अडकलेल्या मराठ्यांच्या शर्थीची ही लढाई या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.(pravin tarde’s baloch)

विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा प्रकाश जनार्दन पवार यांचीच असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्माते आहेत तर पल्लवी विठ्ठल बंडगर, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार, सहनिर्माते आहेत.(pravin tarde’s baloch)