Pravin Tarade And Snehal Tarade : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या महाकुंभ मेळ्यात फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोक येत आहेत. १४४ वर्षांनी आलेल्या या महाकुंभमेळ्यात देशाविदेशातील सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या नामांकित व्यक्ती सहभागी होत आहेत. महाकुंभमेळ्यामध्ये वेगवेगळे अघोरी आणि नागा साधू बाबा यांचे महिन्याभरापूर्वीच प्रयागराज येथे आगमन झाले होते. यापाठोपाठ अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान करण्यासाठी जाताना दिसले. इतकंच नव्हे तर मराठी कलाविश्वातील कलाकारांनीही या महाकुंभमेळ्याला हजेरी लावलेली पाहायला मिळाली.
अशातच एका मराठमोळ्या कलाकार जोडीने या महाकुंभमेळ्याला हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. ही कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे. प्रवीण व स्नेहल हे सिनेविश्वात बऱ्यापैकी सक्रिय असतात. प्रवीण यांच्या पाठोपाठ स्नेहलने ही दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे. प्रवीण व स्नेहल यांनी आजवर अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. आता प्रेक्षकांची ही लाडकी जोडी महाकुंभमेळ्यात सहभागी झाली आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री करतेय ‘या’ सुप्रसिद्ध क्रिकेटरला डेट, रोमँटिक फोटो समोर येताच चर्चा
प्रवीण यांनी पत्नीसह कुंभमेळ्याला हजेरी लावली. या दोघांचे त्रिवेणी संगम येथे स्नान करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. “अद्भुत अनुभव. त्रिवेणी संगम स्नान, २९ जानेवारी २०२५, मौनी अमावस्या महाकुंभ २०२५, प्रयागराज, उत्तर प्रदेश”, असं कॅप्शन देत तिने इंस्टाग्राम अकाउंटवर कुंभमेळ्यातील स्नान करतानाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर प्रवीण यांनी थेट त्रिवेणी संगमवर व्हिडीओ बनवत असं म्हटलं की, “मी आहे त्रिवेणी संगमावरती, सगळ्यात शुभमुहूर्तावर मी अमृत स्नान करायला आलो आहे. जर तुम्ही पाहत असाल तर संपूर्ण परिसर मुक्काम पोस्ट प्रयागराज झाला आहे”.
आणखी वाचा – हल्ल्यानंतर करीना-सैफने मुलांच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल, पापाराझी अन् मीडियाला केली ‘ही’ विनंती
पुढे ते म्हणाले, “हे सर्व पाहून या त्रिवेणी संगमावर मला आठवलं ते म्हणजे आपलं ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राने बनवलेला सिनेमा येत्या ३१ जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. मंगेश देसाई, सचिन नारकर , संकेत माने या पवित्र भूमीवरुन तुमच्या सिनेमाला मनःपूर्वक शुभेच्छा कारण तो सुद्धा या गंगा यमुने सारखाच पवित्र आणि निर्मळ आहे. महाकुंभ मेळ्यातल्या अशा पवित्र स्नानाच्या दिवशी मी प्रार्थना करतो की, आपला लाडका ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा सिनेमा महाराष्ट्रात अगदी धुमधडाक्यात होऊ दे. जय श्रीराम”.