गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding : बाशिंग, पारंपरिक दागिने अन् मराठमोळा पेहराव; प्रथमेश परब-क्षितिजा घोसाळकरच्या लग्नाचा लूक ठरतोय लक्षवेधी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 24, 2024 | 4:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding Marathi News

बाशिंग, पारंपरिक दागिने अन् मराठमोळा पेहराव; प्रथमेश परब-क्षितिजा घोसाळकरच्या लग्नाचा लूक ठरतोय लक्षवेधी

Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Marriage : गेल्या काही दिवसांपासून मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान, प्रथमेश परबच्या घरीही लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळाली. त्याच्या लग्नापुर्वीच्या विधींच्या फोटोंनीही सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यानंतर आता अखेर प्रथमेश परब बोहोल्यावर चढला आहे. प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.

प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर ही जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. दोघांनी त्यांच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अभिनेत्याने स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे. लग्नाचे फोटो शेअर करत प्रथमेशने लिहिलं आहे, “अखेर लॉकडाऊन लव्हस्टोरीचे हृदय कायमसाठी लॉक झाले”. या लग्नाच्या फोटोंमध्ये दोघंही फार सुंदर दिसत असून खूप आनंदात पाहायला मिळत आहे. लग्नासाठी दोघांचा खास पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला.

आणखी वाचा – लग्न लागताच बायकोच्या पाया पडला प्रथमेश परब, पत्नीनेही नमस्कार केला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

लग्नात क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, ज्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. तसेच प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता आणि बायको क्षितीजाला मॅचिंग करण्यासाठी त्याने गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती. याशिवाय प्रथमेशने गुलाबी व पिवळ्या रंगाचा फेटाही बांधला होता. तसेच क्षितिजाच्या मोत्याच्या दागिन्यांनीही खास लक्ष वेधून घेतले होते. दोघांचा हा मराठमोळा पेहराव पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरचा विवाहसोहळा संपन्न, मराठमोळ्या पद्धतीने पार पडलं लग्न, साधेपणाने वेधलं लक्ष

प्रथमेश व क्षितिजा यांच्या लग्नातील विशेष बाब म्हणजे बाशिंग. आजकालच्या काळात लग्नसोहळ्यात वधूवराला मुंडावळ्या बांधण्याची पद्धत आहे. मात्र, आधीच्या काळात मुंडावळ्या ऐवजी बाशिंग बांधलं जायचं. काही जणांकडे फक्त मुंडावळ्या असतात. तर काही जणांकडे बाशिंग बांधण्याची पद्धत आहे. बाशिंगाच्या डोक्यावर मोठा तुरा असतो. काही विशिष्ट लोकांकडेच हा बांधला जातो. अशाप्रकारे अगदी पारंपरिक व जुन्या चालीरीतींना प्राधान्य देत प्रथमेश व क्षितिजा यांनी बाशिंग बांधलेलं पाहायला मिळालं. दोघांच्या लूकच भरभरून कौतुक होत असून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: entertainmentmarathi actorPrathamesh Parab Kshitija GhosalkarPrathamesh Parab Kshitija Ghosalkar weddingPrathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding look
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Prathamesh Parab wife Kshitija Ghosalkars attractive mangalsutra grabbed attention

Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding : प्रथमेश परबच्या बायकोच मंगळसूत्र आहे खूपच खास, सोशल मीडियावर रंगली चर्चा, डिझाइनने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.