शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला गुडबाय किस देणं, फोन करणं…”, बायकोच्या वाढदिवसाला भरभरुन बोलला प्रसाद जवादे, म्हणाला, “तुझ्यासाठी माझं आयुष्य…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 31, 2025 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prasad Jawade wished his wife Amruta Deshmukh on her birthday

प्रसाद जवादेने अमृता देशमुखच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला रोमॅंटिक फोटो, पोस्ट व्हायरल

फ्रेशर्स या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख. मालिका व नाटकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. यानंतर अभिनेत्रीने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता. यात तिचे प्रसाद जवादेबरोबर सुर जुळले. या जोडीने ‘बिग बॉस’ मराठीमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा मिळवली. ‘बिग बॉस’चा हा सिझन गाजवल्यानंतर घरातून बाहेर पडून त्यांनी फोटो शेअर करत चाहत्यांना त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी लवकरच लग्न करणार असल्याचं सांगत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. अमृता-प्रसाद सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. (Prasad Jawade wished Amruta Deshmukh)

अशातच आज अमृता देशमुखचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अमृताबरोबरचा रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने अमृताला किसही केला आहे. शिवाय मोठी पोस्ट लिहीत त्याने अमृताचे कौतुक केलं आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “तू मला उठवणं, तुझ्यासाठी कॉफी बनवणं, कामावर जाण्याआधी गुड बाय किस देणं, कामावरुन तुला फोन करणं, कामावरुन येताच परत घरी तुला भेटणं, ते एक फूल आणणं, एकत्र जेवण करणं… मुळात प्रत्येक गोष्ट तुझ्यासह करायची आहे, फक्त तू आणि तू”.

आणखी वाचा – जपनाम सुरु करा, बाबा निराला आले! ‘आश्रम ३’ प्रेक्षकांच्या भेटीला, काय असेल कथा?

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या प्रिय मैत्रीणी, प्रियसी आणि पत्नी तुझ्यासाठी माझे आयुष्य ऋणी आहे! ३१ जानेवारी हा माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान दिवस! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, अमृता देशमुख तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. तसंच अमृताच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा – वाढदिवशी सायली संजीव वडिलांच्या आठवणीत भावुक, फोटो पोस्ट करत म्हणाली, “खूप आठवण येतेय आणि…”

दरम्यान, अनेक मालिकांमधून दिसणारी अमृता देशमुख सध्या तिच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. अमृता देशमुख सध्या संकर्षण कऱ्हाडेबरोबर ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. सध्या या नाटकाचे जोरदार प्रयोग महाराष्ट्रभर सुरु आहेत. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर प्रसाद झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Tags: amruta deshmukh birthdayprasad jawade and amruta deshmukhPrasad Jawade wished Amruta Deshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Mamta Kulkarni Removed From Post Of Mahamandaleshwar

आधी सन्मानित केलं आता ममता कुलकर्णींकडून किन्नर आखाड्याची पदवीच काढून घेतली, पण असं नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.