अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तीच्या कामाने प्रेक्षकांची मनं जिंकत असते. तीने अभिनयापलिकडे जाउन, लेखन आणि व्यावसायातही तीची छाप पाडली आहे. काही महिन्यांपुर्वी तीचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर तिने तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड लाँच केला होत. तर आता ति त्यांचे महत्तव सांगत आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Prajakta Mali video)
प्राजक्ता माळी ही सध्याच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि सोशल मीडियच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना तिच्या कामाबद्दल माहिती देत असते. प्राजक्ता गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची हस्य जत्रा या सोनी मराठीवरील कार्यमक्रमाचं निवेदन करताना पाहायला मिळत आहे . मात्र आता ती एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
पहा काय म्हणाली प्राजक्ता माळी ? (Prajakta Mali video)

या व्हिडीओत ती सोन्याचे दागिने, पैंजण याबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी ती म्हणाली, “प्रत्येकाच्या गळ्यात एखादा सोन्याचा अलंकार असावा. अंघोळ करताना त्याचं पाणी अंगावरुन झिरपावं, ते चांगलं असाव. पायात पैंजण किंवा साखळी असावी. तुमच्या शरीराचं तापमान, मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास यामुळे नियंत्रित करण्यास मदत होते.” “मी दागिन्यांचा अभ्यास करताना मला विविध गोष्टी समजल्या. यातील अनेक गोष्टी माझ्यासाठीही आश्चर्यकारक होत्या. अलंकार हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून किंवा ते सौंदर्यनिर्मितीसाठी नाही. मानवी शरीरावरही त्याचा खूप परिणाम होतो. त्यामुळे नक्कीच अलंकार घालावेत”, असे प्राजक्ता माळी म्हणाली.(Prajakta Mali video)
हे देखील वाचा – “कुठे दाद मागावी?” नाट्यगृहांतील गैरसोयीबाबत वैभव मांगलेंचा संताप
प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ स्वत:चा असा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला. जानेवारी २०२३ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्रँडचे अनावरण करण्यात आले होते. या दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये सोनसळा (इमिटेशन दागिने), म्हाळसा (चांदीचे दागिने) आणि तुळजा (सोन्याचे दागिने) अशा श्रेणीतील दागिने उपलब्ध आहेत.
प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयातील वेगवेगळ्या भूमिकांमुले प्रेक्षकांच्या पसंतस उत्तरते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसिरीज मध्येही काम केले आहे. तिने निवडलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.