हास्यवीर प्रभाकर मोरे प्रेक्षकांना नेहमीच खळखळून ठेवण्यात व्यस्त असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील प्रभाकर मोरे यांचे आगळेवेगळे पात्र रसिक प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडते. कोकणवासी असलेल्या प्रभाकर मोरेंनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. सांस्कृतिक पदाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रभाकर मोरे सांभाळत आहेत. प्रभाकर मोरे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये विनोदी आणि सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमीच विशेष पसंती मिळते. प्रभाकर मोरे हे आपल्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.(prabhakar more holi special)
अशातच प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही व्हिडीओ शेअर केले आहेत. प्रभाकर मोरे शिमग्यानिमित्त त्यांच्या बिझी श्येडुल मधून वेळात वेळ काढून गावाकडे गेले आहेत. कोकणात शिमगा हा जोरदार साजरा केला जातो. प्रभाकर मोरे हे मूळचे कोकणातलेच आहेत. आणि कोकणी माणूस शिमग्याला गावी गेला नाही असं होणारच नाही. प्रभाकर मोरे यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि त्यांचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या गावच्या घरासमोर पालखी नाचवताना दिसत आहे. आंब्याची कैरी टिप टिप गळे, आमची वाघजाई शिमग्यात खेळे रे……असे कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
पहा प्रभाकर मोरे यांचा धमाल व्हिडीओ – (prabhakar more holi special)
याशिवाय त्यांच्या आणखी एका व्हिडिओमध्ये ते पालखी सोबत ढोल ताशे वाजवताना दिसत आहेत. दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं रंजक ठरतंय. मनसोक्तपणे ते त्यांच्या वादनात बेधुंद झालेले दिसत आहेत. (prabhakar more holi special)
कोकणची लोकधारा जपणारे प्रभाकर मोरे हे त्यांच्या शालू या गाण्यामुळे प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरतात. कोकणी भाषेत विनोद करणारे प्रभाकर मोरे महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत नेहमीच खळखळून हसायला भाग पाडतात.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
====
हे देखील वाचा – जुईने गायलं मालिकेचा टायटल सॉंग,सोशल मीडियावर व्हिडीओचा धुमाकूळ!
====
‘पांघरुण’, ‘टकाटक’, ‘कुटुंब’, ‘कट्टी बट्टी’, ‘बाई गो बाई’, ‘भाई-व्यक्ती की वल्ली’, ‘धोंडी चम्प्या – एक प्रेमकथा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमांमधील प्रभाकर मोरे यांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं.(prabhakar more holi special)