बॉलिवूडची फिटनेस गर्ल अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा पती राज कुंद्रा बराच चर्चेत आला आहे. त्याची सस्पेन्सफुल आयुष्यावर आधारित ‘UT 69’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज आज झाला. या ट्रेलरच्या रिलीज राज कुंद्रा स्वतः उपस्थित होता. बरेच दिवस मास्क मुळे या चित्रपटाचा सस्पेन्स निर्माण केला होता. पण यावरही राज कुंद्राने वक्तव्य केलं. ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमावेळी राज भावुकही होताना दिसला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसतो. (Raj kundra cry and get emotional at the trailer launch)
ट्रेलरनुसार ही कथा राज कुंद्राच्या आयुष्यावर आधारित आहे. जिथं राजची तुरुंगातील आयुष्याबाबत हुबहू चित्रण करत ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमध्ये राजला तिथले कैदी ‘पोर्न किंग’ म्हणून हाक मारताना दिसतात. हा चित्रपट फक्त राज कुंद्राचं जेलमधील आयुष्यच नाही तर तुरुंगातील कैद्यांच्याही परिस्थितीशी निगडीत आहे. या चित्रपटात बरेच भावनिक क्षणही आहेत तर कुठे हल्का फुल्का विनोदाचा तडका पाहायला मिळत आहे.
या ट्रेलरच्या प्रदर्शनावेळी राज कुंद्राने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्याला बरेच प्रश्न विचारण्यात आले. ‘पोर्न किंग’ व ‘मास्क मैन’ सारखे टॅग त्याला लोकांनी दिले आहेत तर यावर तो बोलना म्हणाला, “काहीतरी लोक बोलतील, लोकांचं कामंच आहे बोलणं.” राज त्याच्या ‘UT 69’ चित्रपटाबद्दल बोलताना भावनिकदेखील झाला. राज बोलला, “मला जे बोलायचं आहे ते बोला, पण माझी मुलं, पत्नीला व कुटुंबावर जाऊ नका यार. त्यांनी तुमचं काय बिघडलं?” .
पुढे राजने सांगितलं की शिल्पाने त्याला प्रत्येक क्षणी सपोर्ट केला आहे. शिल्पाने त्याला कधीच चुकीचं समजलं नाही. नेहमीच ती सपोर्ट सिस्टीम प्रमाणे माझ्याबरोबर राहिली. कठीण काळात तिने नेहमी मला हिंमत दिली. राजने सांगितलं की या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीची स्ट्रेटर्जी ही शिल्पाचीच होती. जर ते मास्क काढून टाकलं असतं तर लोकं काही दिवसात आम्हाला विसरले असते. पण त्यांनी या चित्रपटासाठी हे मास्क घालून ठेवलं. कारण लोकं त्यांना लक्षात ठेवतील. राज आता मास्क लावणार नाहीत.