शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लेकाला भेटण्यासाठी परदेशात गेली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, धमाल-मस्ती करतानाचे व्हिडीओही केले शेअर, कमेंट्सचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 24, 2024 | 12:04 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Popular marathi TV actress Uma Sardeshmukh went to meet her son and she has shown a special glimpse of her journey from India to America

Video : लेकाला भेटण्यासाठी परदेशात गेली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, धमाल-मस्ती करतानाचे व्हिडीओही केले शेअर, कमेंट्सचा वर्षाव

छोट्या पडद्यावरील ‘कन्यादान’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘अजूनही बरसात आहे’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून व मोठ्या पडद्यावरील ‘सुभेदार’, ‘मिस्टर अँड मिसेस ब्रम्हचारी’, ‘दशक्रिया’, ‘शेंटीमेंटल’ अशा गाजलेल्या चित्रपटात अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उमा सरदेशमुख. त्यांनी अनेक मालिका व चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या या अभिनेत्री सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच त्यांच्या दैनंदीन जीवनातील काही घडामोडीही शेअर करत असतात.

उमा या कामानिमित्त भारतात राहतात. पण त्यांचा मुलगा कामानिमित्त परदेशात राहतो. उमा आपल्या लेकाला भेटण्यासाठी परदेशात गेल्या असून या परदेशवारीची खास झलक त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. उमा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांचा परदेशवारीचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. भारतातून अमेरिकेत जाण्याची खास झलक त्यांनी एका खास व्हिडीओद्वारे शेयर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Uma Sardeshmukh (@umasardeshmukh)

आणखी वाचा – Video : अधिपती-अक्षरामध्ये खुललं प्रेम, परदेशात हनिमून करत आहेत एन्जॉय, रोमँटिक व्हिडीओ समोर

उमा सरदेशमुख यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या अमेरिका दौऱ्याचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. यापैकी पहिल्या व्हिडीओमध्ये अमेरिकेत घेऊन जाणाऱ्या सामानाची झलक दाखवली आहे. यामध्ये त्यांनी खाऊची व अमेरिकेत लागणाऱ्या कपड्यांच्या बॅग्स दाखवल्या आहेत, तसेच दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी गाडीत बसल्यापासून विमानातून अमेरिकेत पोहोचल्याची झलक दाखवली आहे. अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या लेकाला अगदी कडकडून मिठी मारली. उमा यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर त्यांना भेटल्यानंतरचा आनंद पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Uma Sardeshmukh (@umasardeshmukh)

आणखी वाचा – ‘स्व. दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४’ पुरस्काराने सिद्धार्थ जाधव सन्मानित, भारावून गेला अभिनेता, म्हणाला, “जगाने म्हणावे…”

दरम्यान, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत उमा या परदेशात गेल्या असून सध्या अमेरिकेत त्या लेकासह एन्जॉय करत आहेत. याचे काही खास क्षण त्या त्यांच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत आहेत. तसेच त्यांच्या या अमेरिकेच्या दौऱ्यानिमित्त अनेक कलाकारांनीही उमा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच “मज्जा कर”, तुझी आठवण येईल” अशा अनेक कमेंट्सही केल्या आहेत.  

Tags: marathi actressmarathi entertainment newsUma Sardeshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Dharmaveer-2 fame actor Prasad Oak recounted an old memory of a grandmother gifted him a silver leaf know more

"२००७मध्ये त्या आजींनी माझ्यासाठी चांदीचं पान बनवलं अन्…", प्रसाद ओकने सांगितला 'त्या' चाहतीचा किस्सा, म्हणाला, "त्या भेटल्या तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.