PM Modi on Chhaava : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या उद्घाटनादरम्यान नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘छावा’ या चित्रपटाचे कौतुक केले. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे आणि पंतप्रधान मोदी यांनी याबद्दल सांगितले की, “आजकाल तर छावा चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे”. आणि या चित्रपटाचा परिणाम देशभरात वाढत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित या चित्रपटाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक होतंय आणि चित्रपट चांगली कमाई करत आहे.
यावर आता भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “महाराष्ट्र आणि मुंबई यांनी मराठी आणि हिंदी सिनेमा यांना एक नवीन उंची दिली आहे. आणि आजकाल ‘छावा’ हा चित्रपट संपूर्ण देशात धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य चित्रपटात पाहायला मिळत आहे”. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीवर प्रेरित आहे.
#WATCH | Delhi: During the inauguration of the 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan, Prime Minister Narendra Modi says "In the country, the Marathi language has given us a very rich Dalit literature. Due to its modern thinking, Marathi literature has also created works… pic.twitter.com/sQ9pdAnMIG
— ANI (@ANI) February 21, 2025
छावा या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्सने केली आहे आणि त्याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे, तर रश्मिका मंदाना येसुबाई भोसले यांच्या भूमिकेत आहेत. तर अक्षय खन्नाने औरंगजेब, डायना पेंटी यांनी जिनात-उन-निस्सा बेगम, आशुतोष राणा यांनी हंबीरराव मोहिते आणि दिव्या दत्ताने सोयराबाई या भूमिका साकारल्या आहेत.
आणखी वाचा – घटस्फोटानंतर क्रिकेटपटू युजवेंद्र चहल पत्नीला देणार ‘इतके’ कोटी, पोटगीच्या रकमेवरही कर आकाराला जातो का?
हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून त्याचे खूप कौतुक झाले आहे. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत तर आतापर्यंत जगभरात ३१० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला. चित्रपटाच्या यशामुळे हा एक महत्त्वाचा चित्रपट बनला आहे जो छत्रपती संभाजी महाराज आणि देशभरातील त्याच्या निर्विवाद धैर्याचे शौर्य सादर करतो.