‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेले कलाकार म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ‘बिग बॉस’ या शोमध्ये असताना या अमृता-प्रसाद या कलाकारांची एकमेकांबरोबर मैत्री झाली आणि त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी शाही विवाह करत एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. या कलाकारांचे एकमेकांवर खूप प्रेम असल्याचे कायमच दिसून आले आहे. सोशल मीडियावरील फोटो व व्हिडीओद्वारे त्यांनी त्यांचे प्रेम कायमच दाखवले आहे.
अमृता-प्रसाद ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यांचे काही खास फोटो, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच अमृता व प्रसादने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसादने अमृतासाठी एक स्पेशल डिश बनवत तिला खाऊ घालण्याचा बेत केला होता आणि याचीच एक झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमधून दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये प्रसादने अमृतासाठी ब्रेड-ऑमलेट बनवले असून हे ऑमलेट त्याने विशिष्ट प्रकारे बनवले असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आणखी वाचा – कुठे गायब झाली ‘तारक मेहता…’मधील अंजली भाभी?, आता फक्त देवभक्तीमध्ये आहे तल्लीन, नेमकं कसं जगत आहे आयुष्य?
यामध्ये प्रसाद अमृतासाठी ऑमलेट बनावट असताना अमृता मागून येते आणि त्याचा व्हिडीओ करते. यादरम्यान त्यांच्यातील संवादही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये प्रसाद ऑमलेटवर बटर लावलेले टोस्ट ठेवतो. यानंतर तयार झालेला पदार्थ अमृताला खाण्यासाठी देतो. यावर अमृताही प्रसादने केलेल्या या ब्रेड-ऑमलेटचे कौतुक करत त्याने बनवलेल्या ऑमलेटवर मस्तपैकी ताव मारते. तसेच या व्हिडीओमध्ये अमृता प्रसादला “तू सर्वांना मी स्वयंपाक करायला शिकावं असं का म्हणत असतो” असं म्हणते. यावर अमृता “तुझ्यासाठी” असं म्हणतो. त्यावर अमृता पुन्हा मजेत “माझ्यासाठी ‘स्विगी’ आहे ना?” असं म्हणते.
दरम्यान, प्रसाद-अमृता यांच्या अनेक व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांकडून नेहमीच चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. त्याचप्रकारे या व्हिडीओलाही चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळत आहे. “मनासारखा जोडीदार भेटायला भाग्य लागतं”, “किती गोड”, खूप छान”, “तुम्ही दोघे खूपच गोड आहात” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या व्हिडीओचे कौतुक केले आहे.