शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पारू’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली,“माझी नवीन कार…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 17, 2026 | 1:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Fame Actress Buy New Car

'पारू' फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार

Paaru Fame Actress Buy New Car: ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’ सध्या प्रेक्षकांच्या विशेष चर्चेत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप उमटवली आहे. या मालिकेमधील प्रिया हे पात्र प्रेक्षकांना विशेष आवडल आहे. प्रेमळ स्वभाव, संयम आणि कुटुंबासाठी घेतलेली ठाम भूमिका यामुळे प्रिया घराघरात पोहोचली आहे. ‘पारू’ मालिकेत प्रिया हे पात्र अभिनेत्री संजना काळे साकारत असून या भूमिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेतील तिच्या अभिनयासोबतच संजना सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती आपल्या दैनंदिन आयुष्यातील खास क्षण, फोटो, व्हिडीओ आणि डान्स रील्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

आणखी वाचा: भाऊच्या धक्क्यावर तन्वीनंतर रितेश देशमुखने रुचिताला चांगलंच झापलं; म्हणाला, “स्वतःलाच पंजे मारणारी वाघीण”

दरम्यान, संजना काळेने नुकतीच तिची नवीन कार घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने रेनॉल्ट (Renault) कंपनीची कार खरेदी केली असून, या गाडीची किंमत अंदाजे सहा लाख ते साडे नऊ लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. संजनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती कार शोरूममध्ये दिसत असून, खरेदी प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांवर सह्या करतानाचे क्षणही पाहायला मिळत आहेत. यानंतर तिने आपल्या नव्या गाडीची पूजा केली. गाडीची चावी स्वीकारतानाचा फोटोही तिने शेअर केला आहे. (Paaru Fame Actress Buy New Car)

View this post on Instagram

A post shared by Sanjana Kale (@sanjanaakale13)

व्हिडीओच्या शेवटी संजना स्वतः गाडी चालवताना दिसत असून, यावेळी तिने सुंदर साडी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओसोबत तिने साध्या शब्दांत “माझी नवीन कार” असं कॅप्शन लिहिलं आहे. संजना काळेच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी ‘अभिनंदन’ म्हणत तिचं कौतुक केलं आहे, तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत तिच्यावर प्रेम व्यक्त केलं आहे. (Paaru Fame Actress Buy New Car)

आणखी वाचा: कोकणच्या उबदार मातीला आणि प्रेमळ नात्याला जोडणारा ‘साकव’, नव्या वेबसीरिजचा मुहूर्त संपन्न, कलाकार…

Tags: entertainmentmarathi actressPaaru actressPaaru Fame Actress Buy New Car\Sanjana Kale
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Tharal Tar Mag

रणबीर कपूरसोबत झळकली 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री, अनुभव शेअर करत म्हणाली, "खऱ्या आयुष्यात अत्यंत नम्र…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.